JNU News Updates, ABVP News Saam Tv
देश विदेश

JNU News : ब्राह्मणांनो, कॅम्पस सोडून जा, अन्यथा.... JNU मध्ये भिंतीवर वादग्रस्त पोस्ट

जेएनयू प्रशासनाकडून अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : सतत विविध कारणांनी चर्चेत असणारं दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (JNU) पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. जेएनयू विद्यापीठाच्या भिंतींवर ब्राह्मण विरोधी घोषणाबाजी लिहिली गेल्याचं आढळून आलं आहे. (Delhi News)

ज्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विद्यार्थ्यांनी केलेल्या दाव्यानुसार स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडिज्-II भवनच्या भिंतींवर ब्राह्मण आणि बनिया समजाविरोधात घोषणा लिहिल्या गेल्या आहेत. जेएनयू प्रशासनाकडून अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. (Latest Marathi News)

जेएनयू परिसरात यामुळे तणावाचं वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेएनयूच्या प्राध्यापकांच्या कॅबिनच्या बाहेरील भिंतीवर वादग्रस्त लिखाण करण्यात आलं आहे. ब्राह्मण कॅम्पस सोडा, इथे खुन होईल , ब्राह्मण भारत छोडो, आणि ब्राह्मण बनिया आम्ही बदला घेणार असं लिखाण भिंतींवर करण्यात आलं आहे.

डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांचं हे कृत्य असल्याचा आरोप आरएसएसशी संलग्न असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे.कम्युनिस्ट गुंडांकडून शैक्षणिक ठिकाणांची मोठ्या प्रमाणात गैरवापर होत आहे, असं म्हणत ABVPने याचा निषेध केला आहे.प्राध्यापकांच्या खोलीच्या फोडून त्यांना धमकावलं असल्याचीही माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: नव्या सरकारचा शपथविधी हा वानखेडे स्टेडियमवर होणार

Eknath Shinde: शिंदेंची ताकद वाढली! अपक्ष आमदारासाठी थेट हेलिकॉप्टरच पाठवलं

Eknath Shinde Press Conference: साष्टांग दंडवत! शिंदे- फडणवीस- पवार लाडक्या मतदारांसमोर नतमस्तक; पाहा VIDEO

Amit Thackeray: मुंबईत राज ठाकरेंना धक्का, अमित ठाकरेंचा पराभव; उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराने मैदान मारलं

Maharashtra Politcs : सहानभुती संपली, मविआ हारली; आघाडीच्या पराभवाची कारणे काय? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT