By-election : सर्व जागांवरती काँग्रेस विजयी; भाजपसाठी धोक्याची घंटा Saam Tv
देश विदेश

By-Election : सर्व जागांवरती काँग्रेस विजयी; भाजपसाठी धोक्याची घंटा

भाजपची सत्ता असणाऱ्या राज्यातच भाजपच्या पदरी अपयश आल्याने ही भाजपसाठी धोक्याची घंटा मानली जातं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : हिमाचल प्रदेशमध्ये Himachal Pradesh पार पडलेल्या विधानसभा पोटनिवडणुकांचे By-Electionआज निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. विधानसभेच्या 3 जागांसाठी झालेल्या या निवडणुका आगामी काळात येणाऱ्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवरती महत्वाच्या मानल्या जात आहेत. आणि अशातच भाजपची सत्ता असणाऱ्या राज्यातच भाजपच्या पदरी अपयश आल्याने ही भाजपसाठी BJP धोक्याची घंटा मानली जातं आहे. तसचं लोकसभेच्या एकाच जागेसाठी झालेल्या निवडणूकीतही काँग्रेसच Congress Win विजयी झालं आहे.

हे देखील पहा -

हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह या लोकसभेच्या LokSabha जागेवर 8766 मतांनी विजय झाल्या. जुब्बल कोटखाई विधानसभेच्या Assembly जागेवरती काँग्रेसचे रोहित ठाकुर यांनी बाजी मारली आहे. तसेच फतेहपुर विधानसभेच्या जागेवर काँग्रसचेच उमेदवार भवानी सिंह यांनी 5789 मतांनी विजय मिळवला आणि अर्की मतदारसंघातील संजय अवस्थी यांनी देखील विजय मिळवला आहे.

महत्वाची बाब म्हणजे हिमाचल प्रदेशमध्ये भाजपच सरकार (BJP Goverment) आहे. 2017 सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकून 68 जागांपैकी भाजपला 44 तर काँग्रेसला 21 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे आजचा काँग्रेसचा विजय हा आगामी काळात भाजपला नक्कीच आव्हानात्मक ठरु शकतो.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

SCROLL FOR NEXT