तमिळनाडूच्या राजकारणात एका नव्या 'मैत्रीपूर्ण' युगाची सुरुवात झालीये. थलपती विजय यांच्या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्यातील एका क्षणाची चर्चा संपूर्ण देशभरात होताना पाहायला मिळतेय. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी थलपती विजय यांच्या शपथविधीला उपस्थिती लावलीये. या शपथविधी दरम्यान या दोन्ही दिग्गज नेत्यांमध्ये कमालीची 'केमिस्ट्री' पाहायला मिळालीय.... मुख्यमंत्री विजय यांनी चक्क स्वतःच्या मोबाईलनं राहुल गांधींसोबतचा खास क्षण कॅमेऱ्यात कैद केलाय. तर दुसरीकडे राहुल गांधींनी थलपती विजय यांना मिठी मारून शुभेच्छा दिल्यात. तामिळनाडूत विजय यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतल्यानं काँग्रेस दक्षिणेतील आणखी एका राज्यात सत्तेत सहभागी होणारेय...
कर्नाटकात मे 2023 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 224 पैकी 135 जागा जिंकून पूर्ण बहुमताने सत्ता स्थापन केली.
तेलंगणात डिसेंबर 2023 मध्ये विधानसभेच्या 119 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने 64 जागा जिंकून सत्ता स्थापन केली.
केरळात मे 2026 मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UDF आघाडीने विजय मिळवला आणि सत्तेत आली
तसंच, तमिळनाडूमध्ये थलपती विजय यांच्या TVKला काँग्रेसनं पाठिंबा देत सरकारमध्ये सहभागी झालीये.
खरंतर, उत्तरेत भाजपचा गड अभेद्य असताना, काँग्रेसनं आता दक्षिणेकडील राज्यांत पूर्ण ताकद झोकून दिलीये. कर्नाटक आणि तेलंगणानंतर केरळमध्ये मिळवलेला विजय आणि आता तामिळनाडूत थलपती विजय यांच्याशी जुळलेली नवी समीकरणं, हे राहुल गांधींच्या बदलत्या रणनीतीचं यश मानलं जातंय. आता काँग्रेसचं पुढचं लक्ष्य असणार आहे ते म्हणजे आंध्र प्रदेश... त्यासाठी वायएस जगमोहन रेड्डी यांच्यासोबत कॉग्रेस कशी गणित जुळवते त्यावर सर्व अवलंबून असेल .त्यामुळे काँग्रेसचं हे 'दक्षिणायन' देशाच्या राजकारणाची दिशा बदलणार का हे पाहण महत्वाचं ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.