Congress Tweet On PM Modi: स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींनी देशवासियांना संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन विरोधकांवर जोरदार निशाणा साधला होता. पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याला आता कॉंग्रेसने प्रत्यूत्तर दिले असून फोटो ट्वीट करत पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सशक्त, भ्रष्टाचारमुक्त आणि विकसित देशाच्या निर्माणाचा वज्रनिर्धार व्यक्त केला होता. यावेळी त्यांनी भ्रष्टाचार, घराणेशाही आणि लांगलुचालनपणामुळे देशाचा विकास खोळंबल्याचे म्हणले होते. पंतप्रधान मोदींच्या याच मुद्द्यावरुन कॉंग्रेसने ट्विट करत उत्तर दिले आहे.
काय आहे ट्वीट..
"मोदीजी भ्रष्टाचारावर बोलत होते..." असे म्हणत कॉंग्रेसने (Congress) हे ट्विट केले आहे. यामध्ये अजित पवार, छगन भुजबळ, नारायण राणे, हसन मुश्रिफ यांच्यासह सुवेंदु अधिकारी, शिवराज सिंह चौहान, बीएस बोम्मई, रघुवर दास, जय पांडा, हिमंता बिश्व सरमा,पेमा खांडू यांचे फोटो आहेत. तसेच या नेत्यांच्या कथित घोटाळ्यांची नावे देत कॉंग्रेसने भाजपवर टीका केली आहे. आता या ट्वीटला भाजप नेते काय उत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अजित पवारांच्या प्रवेशाने होतेयं टीका...
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीच आपल्या भाषणामध्ये राष्ट्रवादी म्हणजे भ्रष्टवादी पक्ष असल्याचे म्हणत अजित पवारांवर हजारो कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर काही दिवसांतच अजित पवार यांनी भाजप सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे पंतप्रधान मोदींवर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.