congress leaders meeting with Rahul Gandhi, Mallikarjun Kharge (File Photo) saam tv
देश विदेश

Politics : काँग्रेसचा 'पायलट' प्रोजेक्ट! निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन राज्यांत मोठी उलथापालथ होणार

congress reshuffle rajasthan goa 2025: काँग्रेस पक्ष संघटन बदल सातत्यानं करत आहे. राज्यांतील निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून नवनवे प्रयोग केले जात आहेत. राज्यांमधील जिल्हाध्यक्ष नियुक्ती हाच त्यातला एक प्रयोग आहे. आता राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलण्याची शक्यता आहे.

Saam Tv
  • काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांची शक्यता

  • हरयाणानंतर आता दोन राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलणार

  • निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आखली खास रणनीती

हरयाणामध्ये प्रदेशाध्यक्ष बदलल्यानंतर काँग्रेस पक्ष नेतृत्व आता आणखी दोन राज्यांमधील प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची शक्यता आहे. राजस्थान आणि गोवा या दोन राज्यांत हा बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या राज्यांत आता पक्षात मागास वर्गाला नेतृत्व मिळण्याची संधी आहे. पक्षाने अलीकडेच हरयाणाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा ज्येष्ठ नेते राव नरेंद्र सिंह यांच्याकडे सोपवली आहे.

याशिवाय पक्षनेतृत्वाने माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांची हरयाणा काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते म्हणून नेमणूक केली आहे. आता पक्षाकडून राजस्थान आणि गोवा या दोन राज्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात विचारमंथन सुरू आहे.

पायलट आघाडीवर

राजस्थानमध्ये प्रदेशाध्यक्षपदासाठी ज्या नावांची सध्या चर्चा सुरू आहे, त्यात छत्तीसगडचे काँग्रेस पक्षाचे प्रभारी सरचिटणीस सचिन पायलट, मध्य प्रदेशचे प्रभारी हरीश चौधरी, तसेच अशोक गेहलोत सरकारमध्ये मंत्री राहिलेले आणि हिंडोली मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करणारे आमदार अशोक चांदना यांच्या नावांचा समावेश आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, पायलट हे यामध्ये आघाडीवर आहेत. पायलट हे ओबीसी समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. याआधीही त्यांनी राज्याचे प्रदेशाध्यक्षपद भूषवलेले आहे.

गोव्यात राहुल गांधींच्या खास नेत्याला संधी?

सूत्रांच्या माहितीनुसार, गोव्यात गिरीश चोडणकर यांना प्रदेशाध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे. पक्षाकडून त्यांना ग्रीन सिग्नल मिळू शकतो. चोडणकर सध्या पक्षाचे तामिळनाडू आणि पुद्दूचेरी राज्याचे प्रभारी आहेत. ओबीसींचे नेतृत्व करणारे चोडणकर हे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे जवळचे मानले जातात.

विशेष म्हणजे, काँग्रेस नेतृत्वाकडून सातत्याने संघटनेत बदल करण्यात येत आहेत. राज्यांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून नवनवे प्रयोग करण्यात येत आहेत. याच दृष्टिकोनातून संघटन सृजन अभियानही राबवले जात आहे. त्यानुसार, राज्यांमध्ये नव्या जिल्हाध्यक्षांच्या नेमणुका करण्यात येत आहेत.

हरयाणात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला होता. त्यानंतर जवळपास एका वर्षाने या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजप ९० पैकी ४८ जागा जिंकून राज्यात सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यात यशस्वी झाले होते. काँग्रेसला ३७ जागांवर विजय मिळवता आला होता. आता या नियुक्त्यांच्या माध्यमातून जाट आणि ओबीसी समाजाची मते मिळवण्याचे लक्ष्य आहे.

राव नरेंद्र सिंह यांनी उदय भान यांची जागा घेतली आहे. ते तीन वेळा आमदार राहिले आहेत. याशिवाय त्यांनी हुड्डा सरकारमध्ये आरोग्य मंत्रिपद भूषवलेले आहे. विधानसभेतील पक्षाचे गटनेते असल्याने हुड्डा हे राज्याच्या विधानसभेत विरोधी पक्षनेतेही असणार आहेत. मागील विधानसभेतही त्यांनी हीच भूमिका बजावलेली होती. हरयाणातील राजकारणातील दिग्गज आणि जाट समुदायाचे नेते असलेले हुड्डा हे दोनदा मुख्यमंत्री, चार वेळा विरोधी पक्षनेते आणि चार वेळा खासदार, सहा वेळा आमदार राहिलेले आहेत. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावरही त्यांनी काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Accident : मुंबई हादरली! आधी महिलेवर अत्याचार केला, नंतर गळा आवळून संपवलं

MHADA Lottery: म्हाडाची ५३५४ घरं आणि ७७ भूखंडांच्या विक्रीसाठी लॉटरी कधी निघणार? वाचा वेळापत्रक

Heart Attack: तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण का वाढलंय? काय आहेत कारणे?

Maharashtra Live News Update: सरकार चालढकल करतेय; माणिकराव ठाकरे यांचा आरोप

Pune Accident : डान्सर गौतमी पाटीलच्या कारचा अपघात, मुंबई-बेंगळूरू महामार्गावर घडली दुर्घटना

SCROLL FOR NEXT