Congress leader Rupesh Thakur passed away after suffering a heart attack during an election campaign in Assam. Saam tv
देश विदेश

काँग्रेसच्या बड्या नेत्याचे निधन; पक्षाचा अनुभवी चेहरा काळाच्या पडद्याआड! राजकीय वर्तुळात हळहळ

Congress Leader Rupesh Thakur Death During Assam Election Campaign: आसाम निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रुपेश ठाकूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गुवाहाटी येथे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Omkar Sonawane

आसाममधील निवडणुकीच्या धामधुमीतच छत्तीसगडमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. बलौदाबाजारचे माजी काँग्रेस अध्यक्ष रुपेश ठाकूर यांचे निवडणूक प्रचारादरम्यान निधन झाले. त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्रकृती खालावली. रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मिळालेल्या माहितीनुसार, रुपेश ठाकूर आसाम निवडणुकीसाठी प्रचार करत होते. याच काळात त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना गुवाहाटी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले. रुपेश ठाकूर यांच्या मृत्यूच्या बातमीने बलौदाबाजार जिल्ह्यात शोककळा पसरली. ते त्यांच्या आनंदी आणि मनमिळाऊ स्वभावासाठी ओळखले जात होते. त्यांनी स्थानिक आणि राज्याच्या राजकारणात मोठी भूमिका बजावली होती. ही घटना घडली तेव्हा ते रायपूरचे माजी आमदार विकास उपाध्याय यांच्यासोबत आसाम निवडणुकीसाठी प्रचार करत होते.

रुपेश ठाकूर यांचा पार्थिव गुवाहाटीहून बलौदा बाजार येथे आणण्याची तयारी सुरू आहे. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. राज्यातील अनेक दिग्गज नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या दुःखद घटनेमुळे काँग्रेस कार्यकर्ते आणि परिसरातील लोक अत्यंत दुःखी झाले आहेत.

छत्तीसगड काँग्रेस नेत्याचे निधन! भूपेश बघेल यांनी केला शोक व्यक्त

माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ट्विटरवर शोक व्यक्त करताना लिहिले, रुपेश ठाकूर हे एक समर्पित आणि मेहनती काँग्रेस कार्यकर्ते होते. त्यांनी पक्षाच्या विचारधारेप्रती पूर्ण निष्ठेने काम केले. त्यांचे अकाली निधन हे पक्षाचे मोठे नुकसान आहे. महसूल मंत्री टंकरम वर्मा यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे, रुपेश ठाकूर हा माझा धाकटा भाऊ होता आणि तो समाजकार्यात गुंतलेला असून लोकांच्या सुख-दुःखात त्यांना आधार देत असे. त्याचे अचानक निघून जाणे अत्यंत दुःखद आहे. मला आज त्याच्या निधनाची बातमी मिळाली. या दुःखद प्रसंगी मी त्याच्या कुटुंबासोबत आहे आणि हे दुःख सहन करण्याची शक्ती देव त्यांना देवो, अशी मी प्रार्थना करतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khajur Chutney Recipe: उन्हाळ्यात घरच्या घरी टेस्टी खजूरची चटणी कशी बनवायची? वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update: पालघर _ डहाणू दिवा लोकलमध्ये मराठी भाषेला दुय्यम स्थान

Accident News : राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात! भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला असलेल्या तरुणाला चिरडले

Cabinet Expansion : नितीश कुमारांच्या मुलासह ३२ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, टीम 'सम्राट'मध्ये कोण कोण?

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त व्याजातून मिळणार ४.५० लाख रुपये

SCROLL FOR NEXT