Congress Protest 
देश विदेश

Congress Protest: दिल्लीत जनसागर! 'इंडिया' आघाडीचा सुप्रीम कोर्टावर महामोर्चा; पाहा खास फोटो

Congress Protest: १२ ऑक्टोबर २०२६ रोजी दिल्लीमध्ये काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या INDIA आघाडीने ‘चलो दिल्ली – मार्च फॉर डेमोक्रसी’ आंदोलन केले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आले.

Shruti Vilas Kadam
Congress Protest

चलो दिल्ली – मार्च फॉर डेमोक्रसी

१२ ऑक्टोबर २०२६ रोजी दिल्लीमध्ये काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या INDIA आघाडीने ‘चलो दिल्ली – मार्च फॉर डेमोक्रसी’ आंदोलन केले. मतदारांच्या फेरतपासणीवरून निवडणूक आयोगाविरोधात हा मोर्चा काढण्यात आला.

Congress Protest

आंदोलन का करण्यात आले?

मतदारांच्या विशेष सखोल फेरतपासणीला (SIR) विरोध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.

Congress Protest

आंदोलनात कोणकोणते नेते सहभागी झाले?

या आंदोलनात राहुल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, राजदचे तेजस्वी यादव आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संजय राऊत यांच्यासह अनेक विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले.

Congress Protest

जनतेला घाबरवता येणार नाही, राहुल गांधींचा संदेश

राहुल गांधी म्हणाले की, देशातील जनतेला धमकावून किंवा घाबरवून शांत करता येणार नाही. सरकारला जनतेची ताकद दाखवणे हा या आंदोलनाचा महत्त्वाचा उद्देश असल्याचे ते म्हणाले.

Congress Protest

मोर्चा कुठे काढण्यात आला?

दिल्लीतील बाराखंभा रोड परिसरातून सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने मोर्चा काढण्यात आला. मात्र, भगवानदास रोडजवळ दिल्ली पोलिसांनी बॅरिकेड्स लावून मोर्चा रोखला.

Congress Protest

सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

राहुल गांधी आणि INDIA आघाडीतील अन्य दहा नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयांना आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. मतदारांमधील बदलांची स्वतंत्र तपासणी आणि फेरतपासणी प्रक्रियेबाबत हस्तक्षेप करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली.

Congress Protest

राहुल गांधी यांनी काय म्हटले?

आंदोलनानंतर राहुल गांधी यांनी सहभागी नागरिक, INDIA आघाडीचे नेते आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी विरोधक एकत्र असल्याचे त्यांनी सांगितले.

Congress Protest

संविधान आणि लोकशाहीसाठी लढा सुरूच राहणार

संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी विरोधकांचा संघर्ष थांबणार नसल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. जनतेने एकजुटीने उभे राहावे आणि कोणत्याही दबावाला बळी पडू नये, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.

Congress Protest

देशभरातील आंदोलनकर्त्यांचे मानले आभार

राहुल गांधी यांनी देशभरातील आंदोलनात सहभागी झालेल्या हजारो नागरिकांचे आभार मानले. तसेच दुपारी ३ वाजता आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या लाखो लोकांचेही त्यांनी कौतुक केले.

Maharashtra News Live Update: पंकजा मुंडे यांनी घेतली विनोद तावडे यांची भेट

Diabetes : चवीला गोड पण डायबिटीज रुग्णांसाठी फायदेशीर, 'हा' पदार्थ हृदयही ठेवतो सुपरहेल्दी

Car Washing: कार धुतल्यानंतर लगेच चालवणे योग्य आहे का?

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांनो लक्ष द्या! पगारवाढ आणि एरियरसाठी करावी लागणार प्रतीक्षा; समोर आली मोठी अपडेट

Gokul Election : गोकुळच्या अध्यक्षांची निवड १० नोव्हेंबरला, उच्च न्यायालयाचे थेट आदेश, कोर्टात नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT