लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेस आणि युवा काँग्रेसचे बँक अकाऊंट फ्रीज केल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. काँग्रेस नेते अजय माकन यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिलीये. पक्षाचे बँक अकाऊंट फ्रीज केल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत, असं त्यांनी म्हटलंय.
काय म्हणाले अजय माकन?
देशातील प्रमुख विरोधी पक्षाची सर्व बँक खाती गोठवण्यात आली आल्याचं आम्हाला सांगितल आहे. काँग्रेस पक्षाची देखील खाती गोठवण्यात आली आहेत. आम्हाला समजलं की युवक काँग्रेसची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. आयकराने युवक काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाकडून 210 कोटी रुपयांची वसुली मागितली आहे. आमच्या खात्यांमध्ये क्राउडफंडिंगचे पैसे गोठवण्यात आले आहेत. निवडणुकीच्या दोन आठवडे आधी जेव्हा विरोधी पक्षांची खाती गोठवली जातात तेव्हा हे लोकशाही गोठवण्यासारखेच आहे, असा दावा अजय माकन यांनी केलाय.
भाजपने गोळा केलेला असंवैधानिक पैसा ते निवडणुकीसाठी वापरतील
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील आपल्या ट्वीटर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. सत्तेची नशा, मोदी सरकारने लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वात जुन्या, सर्वात मोठ्या विरोधी पक्ष काँग्रेसची खाती गोठवली आहेत. हा लोकशाही मोठा आघात आहे. भाजपने जे असंवैधानिक धन जमा केलं आहे, त्याचा वापर ते निवडणुकीत करतील, असं खरगेंनी म्हटलंय.
भविष्यात कोणत्याही निवडणुका होणार नाहीत
आम्ही क्राउफंडिंगद्वारे जो पैसा जमा केला आहे तो फ्रीज करण्यात आलं आहे. त्यामुळे आम्ही म्हणतोय भविष्यात कोणत्याही निवडणुका होणार नाहीत. आमचं न्यायव्यवस्थेला आवाहन आहे की देशातील बहुपक्षीय प्रणाली सुरक्षित ठेवा आणि लोकशाही सुरक्षित ठेवा. आम्ही या हुकूमशाहीविरोधात लढा देऊ, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.
काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील ट्वीट करत भाजपवर हल्लाबोल केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला इनकम टॅक्स विभागाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सर्व बँक खाती गोठवली आहेत. एक भ्याड आणि चिंताग्रस्त हुकूमशहा सत्तेसाठी काहीही करण्यास तयार आहे, असं नाना पटोलेंनी ट्वीटमध्ये म्हटलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.