Congress chief Mallikarjun Kharge’s remark on PM Modi triggers political controversy in Chennai. saam tv
देश विदेश

"पंतप्रधान मोदी दहशतवादी आहेत...", मल्लिकार्जुन खरगे यांचं वादग्रस्त वक्तव्य

Mallikarjun Kharge’s Controversial Comment on PM Modi: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठे राजकीय वाद निर्माण झाला आहे. वाढत्या वादानंतर खरगे यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे.

Bharat Jadhav

  • चेन्नईतील पत्रकार परिषदेत विधान

  • नंतर खरगे यांच्याकडून स्पष्टीकरण

  • मोदींना दहशतवादी संबोधल्यामुळे वाद निर्माण झाला.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी चेन्नईतील एका पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत एक वादग्रस्त विधान केले आहे. खरगे यांनी पंतप्रधान मोदींना थेट दहशतवादी संबोधलं आहे. खरगेंच्या वक्तव्यामुळे एक नवीन वाद निर्माण झाला आहे. खरगे यांनी एआयएडीएमकेवर टीका करताना हे वादग्रस्त विधान केले आहे. जे अण्णादुराईंच्या विचारधारेचे पालन करतात ते समानता आणि न्यायावर विश्वास न ठेवणाऱ्या पंतप्रधान मोदींची बाजू कशी घेऊ शकतात.

भाजपसोबत युती करून एआयएडीएमके लोकशाहीला कमकुवत करत आहे. ते पंतप्रधान मोदींची गुलाम बनले आहेत, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी केला. पुढे बोलताना खरगे यांनी पंतप्रधान यांना दहशतवादी म्हटलं. दरम्यान आपल्या विधानामुळे वाद वाढत असल्याचं समजताच खरगे यांनी आपल्या विधानाची सरवासावर केली आहे. ते म्हणाले की, त्यांना कोणालाही दहशतवादी म्हणायचे नव्हते, तर पंतप्रधान नेहमीच इतरांना घाबरवत असतात असं म्हणायचं होतं.

काय आहे संपूर्ण वाद?

मल्लिकार्जुन खरगे हे चेन्नईमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना एआयएडीएमकेवर टीका करत होते. अण्णादुराईंच्या विचारसरणीचे पालन करणारे लोक पंतप्रधान मोदींशी कसे काय संबंध ठेवू शकतात, असा प्रश्न त्यांनी केला. पुढे बोलताना ते म्हणाले, " मोदी एक दहशतवादी आहेत. त्यांचा पक्ष समानता आणि न्यायावर विश्वास ठेवत नाही." खरगे पुढे म्हणाले की, एआयएडीएमकेने आता आपली ओळख गमावली आहे, ते पंतप्रधान मोदींचे गुलाम बनले आहेत.

खरगेंनी दिलं स्पष्टीकरण

आपल्या वक्तव्यामुळे वाद वाढू लागल्याचे समजल्यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या विधानाची सरवासावर केली आहे. माझा त्यांना दहशतवादी म्हणण्याचा उद्देश नव्हता. तर मला हे म्हणायचे होते की ते लोकांना आणि राजकीय पक्षांना सतत 'दहशत' मध्ये ठेवतात. त्याच्याकडे ईडी, सीबीआय आणि आयकर विभागासारख्या यंत्रणा आहेत. त्याचा वापर ते इतरांना घाबरवण्यासाठी करत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Long Hair Growth Tips: लांब आणि सरळ केसांसाठी 5 सोपे घरगुती उपाय

Wednesday Horoscope : वैवाहिक आयुष्यात वादळ येण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना धाडसी निर्णय घ्यावे लागतील

Maharashtra News Live Update: अजित दादाचा वारसा पुढे घेऊन जाण्याचा ताकदीने प्रयत्न करेन- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

पक्षातील वाद रस्त्यावर! आधी हाणामारी नंतर RPI जिल्हाध्यक्षासह चार जणांवर गुन्हा दाखल

HSC, SSC Result: बारावी बोर्डाचा निकाल कधी जाहीर होणार? mahresult.nic.in वर डाउनलोड करा मार्कशीट

SCROLL FOR NEXT