congress leader death  Saam tv
देश विदेश

निवडणूक होताच काँग्रेस नेत्याची गोळ्या झाडून हत्या; राजकीय वर्तुळात खळबळ

congress leader death : निवडणूक होताच काँग्रेस नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

Vishal Gangurde

पंजाबमध्ये काँग्रेस नेत्याची हत्या

उमरसीर सिंह यांची गोळ्या झाडून हत्या

उमरसीर सिंह यांच्या हत्येने राजकीय वर्तुळात खळबळ

पंजाबच्या मोगाच्या धर्मकोट हलके या भागातील भिंडर कला गावात शनिवारी सकाळी काँग्रेस नेत्याची हत्या झाल्याची घटना घडली आहे. उमरसीर सिंह असे हत्या झालेल्या नेत्याचे नाव आहे. या हत्येनंतर मृत उमरसीर यांच्या नातेवाईकांनी कारवाईसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. नातेवाईक पोलीस स्टेशनसमोरच आंदोलनाला बसले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उमरसीर सिंह हे शनिवारी सकाळी कारने कामाला निघाले. घरापासून ५०० मीटर दूर पोहोचल्यानंतर अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना गाठलं. त्यानंतर या हल्लेखोरांनी काँग्रेस नेत्यावर १० ते १५ राऊंड गोळीबार केला. या गोळीबारात काँग्रेस नेते उमरसीर सिंह यांचा जागीच मृत्यू झाला.

वहिनीने ब्लॉक समितीची निवडणूक जिंकली होती

उमरसीर सिंह हे नेस्ले इंडिया लिमिटेड कंपनीत कार्यरत होते. तसेच कामगार यूनियनचे नेते होते. त्याचबरोबर काँग्रेससाठी देखील काम करत होते. ते गावात पंचायतचे सदस्य देखील होते. २०२५ साली झालेली ब्लॉक समितीची निवडणूक त्यांची वहिनी वीरपाल कौर यांनी लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता.

उमरसीर सिंह यांच्या मृत्यूने त्यांचा १३ वर्षीय मुलगा आणि ६ वर्षीय मुलीने मोठा आधार गमावला आहे. राजकीय वादातून त्यांची हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. कुटुंबीयांचं आरोप आहे की, 'गावातील सरपंच इंदरपाल सिंह यांनी राजकीय वादातून उमरसीर सिंह यांची हत्या केली आहे. उमरसीर सिंह यांच्या भावाने थेट सरपंचावर हत्येचा षडयंत्र रचल्याचा आरोप केलाय.

उमरसीर सिंह यांच्या कुटुबीयांना पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिलं आहे. या प्रकरणी पोलिसांत सरपंच इंदरपाल सिंह यांच्यासहित ७ लोकांच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी कारवाईलाही सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajasthan: राजस्थानमधून १० हजार किलो स्फोटकं जप्त, प्रजासत्ताक दिनादरम्यान काय प्लान होता? तपास सुरू

Gold Rate Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं महागलं! १० तोळ्यामागे २४,५०० रुपयांची वाढ; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Ind Vs Nz: बॅट लोखंडाची नाहीये ना? तुफान खेळीनंतर किवींनी तपासणी अभिषेक शर्माची बॅट

Maharashtra Live News Update: कर्तव्यपथावर शौर्यदर्शन! ३० चित्ररथांचं संचालन सुरु

O Romeo : शाहिद कपूर झाला मालामाल; 'ओ रोमियो'साठी घेतलं तगडे मानधन, नाना पाटेकरांची फी किती?

SCROLL FOR NEXT