PM Narendra Modi SAAM TV
देश विदेश

PM मोदींवर टीका करताना काँग्रेस नेत्याची जीभ घसरली, गुन्हा दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी कॉंगेस नेत्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

नागपूर : कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) तसेच राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने नोटीस बजावली होती. त्यानंतर कॉंग्रेसच्या गोटातून केंद्र सरकार (central government) आणि सक्तवसुली संचनालयाविरोधात टीकेची झोड उठवण्यात आली. गेल्या दोन-तीन दिवसांपासून कॉंग्रेसच्या मंत्र्यांनी, तसेच कार्यकर्ते ईडीच्या कार्यलयावर (Enforcement directorate) धडकले आहेत. कॉंग्रेसने मोदी सरकार विरोधात तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. याच दरम्यान राहुल गांधी यांची ईडीने गेले तीन दिवस कसून चौकशी केली आहे. मात्र, दुसरीकडे कॉंग्रेसच्या नेत्यांनी मोदी सरकारवर टीका करण्याचं सत्र सुरुच ठेवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबाबत प्रतिक्रिया देताना नागपुरचे कॉंग्रसचे माजी शहराध्यक्ष शेख हुसेन यांची जीभ घसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्यावतीने नागपूर ईडीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.यावेळी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मंचावर उपस्थित असताना मोदी सरकारच्या विरोधात भाषणे दिली. याचदरम्यान काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शेख हुसेन (Shaikh hussain) यांची पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करताना जीभ घसरली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल त्यांनी आक्षेपार्ह विधान केलं. मोदी यांच्यावर टीका करताना शेख म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मृत्यू असा होईल की...! त्यानंतर ते म्हणाले, या विधनासाठी एखादी नोटीसही येईल, पण याची मला काही परवा नाही, असं वक्तव्य शेख यांनी केलं.

त्यानंतर भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेत शेख यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. त्यानंतर शेख हुसेन यांनी या प्रकाराबाबत प्रतिक्रिया दिलीय. शेष म्हणाले, मी अशा प्रकारचे कोणतेही वक्तव्य केले नाही. भारतीय जनता पक्ष आता या गोष्टीला वाढवत आहे. प्रधानमंत्री हे सर्व देशवासीयांसाठी आदरणीय असून मी केलेलं वक्तव्य हे एका म्हणीचा वापर असल्याचेही हुसेन म्हणाले.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

SCROLL FOR NEXT