'संजय राऊत यांच्या अंगात आलं आणि ...'; राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी उलगडले गुपित

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अंगात आलं आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले, असं विधान राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम (vishwajeet kadam) यांनी केलं.
 vishwajeet kadam
vishwajeet kadamSanjay Raut
Published On

सांगली : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अंगात आलं आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले, असं विधान राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम (vishwajeet kadam) यांनी केलं. कदम यांनी मंगळवारी आमणापूर गावातील विविध विकासकामांसाठी तब्बल अडीच तास वेळ दिला. त्यावेळी आमणापूर ग्रामस्थांना संबोधित करताना राज्यमंत्री कदम चांगलेच मुडमध्ये बॅटींग करताना पाहायला मिळाले. ( Maharashtra Politics News In Marathi )

 vishwajeet kadam
शरद पवारांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी ही विरोधी पक्षांची इच्छा!

या कार्यक्रमात ग्रामस्थांना संबोधताना कार्यक्रमाला उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतानाच अजून पोळ्या खायच्या राहिल्याचे सांगितले. एवढा उशीर होईल माहिती असते तर दिवस ही वेगळा निवडला असता तर दहा बारा बोकड...असे राज्यमंत्री म्हणताच उपस्थितांनी हसून मनापासून दाद दिली.

 vishwajeet kadam
Presidential Elections 2022 : राष्ट्रपतिपदासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर , वाचा सविस्तर माहिती

पुढे महाविकास आघाडी कशी सत्तेवर आली हे सांगताना विश्वजित कदम म्हणाले, 'निवडून आलो तरी विरोधी बाकावर बसावं लागणार होतं...पण शिवसेना खासदार संजय खासदार संजय राऊत यांच्या अंगात आलं आणि तीन पक्षाची महाविकास आघाडी स्थापन झाल्याचे गुपित राज्यमंत्र्यांनी सांगितले. गुपित सांगताच उपस्थित लोकांमध्ये एकच हसू उमटले. राज्यमंत्र्यांच्या या मिश्किल बोलण्याने आमणापूर ग्रामस्थांना पुन्हा दिवंगत डॉ. पतंगराजव कदमांची आठवण आली.

महाविकास आघाडीचे श्रेय दिले संजय राऊतांना

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येत राज्यात सरकार स्थापन केले. या महाविकास आघाडीचे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जाते. मात्र, डॉ. विश्वजीत कदम यांनी महाविकास आघाडीचे श्रेय संजय राऊतांना दिलं.त्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com