'हिंदुत्व पहायचं असेल तर...': सलमान खुर्शीद Saam Tv
देश विदेश

'हिंदुत्व पहायचं असेल तर...': सलमान खुर्शीद

कॉंग्रेस नेता आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्या नैनिताल या ठिकाणी असलेल्या घरावर हल्ला करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : कॉंग्रेस नेता आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्या नैनिताल या ठिकाणी असलेल्या घरावर हल्ला करण्यात आला आहे. खुर्शीद यांच्या घराची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली आहे. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी राकेश कपिलसह २० जणांविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेवर सलमान खुर्शीद यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सलमान खुर्शीद यांनी आपले पुस्तक ‘Sunrise Over Ayodhya’ मध्ये हिंदुत्वाची तुलना आयसीस आणि बोको हराम या दहशतवादी संघटनांशी केल्याने हा वाद निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. यादरम्यान त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हल्ल्यावरुन नाराजी जाहीर केली असून, हिंदुत्व काय करत हे बघायचे असेल तर, माझ्या घराचा जळालेला बघा असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

हे देखील पहा-

पुस्तकातील उल्लेख चुकीचा वाटतो का असे विचारण्यात आले असता ते म्हणाले की, “अजिबात नाही, अन्यथा मी पत्रकार परिषद बोलावली असती. जे असहमत आहेत. त्यांनीदेखील स्पष्ट सांगितले नाही. माझं नैनिताल या ठिकाणी असलेल्या घर जाळण्यापर्यंत ते पोहोचले आहेत. यावरुनच मी काय सांगत आहे ते सिद्ध होत नाही का? त्याचे हिंदुत्व विरोधाभास निर्माण करणारे आहे. त्यांनी जे केले आहे, त्यावरुन माझे वक्तव्य योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे.

फक्त फोन किंवा सोशल मीडियावरुन शाब्दिकदृष्ट्या नाही तर थेट घरावर हल्ला करण्यात आला आहे. राजकीय हिंदुत्वाची तुलना दहशतवादाशी करणे योग्य आहे का? असे विचारण्यात आले असता ते म्हणाले, मी साधर्म्य असल्याचे त्यांनी सांगितले आहे. एकसारखे किंवा समान असल्याचे सांगितले नाही. यामध्ये काही विशेषता असून धर्माचा होणारा गैरवापर मुख्य मुद्दा आहे.

जिहादींविषयी बोलायचे गेल्यास जर इस्लाम माझा धर्म असेल, तर मग त्याचा गैरवापर करणाऱ्यांविषयी मला बोलण्यापासून का रोखले जातं आहे? सर्व धर्मांना एकत्र आणणे हाच माझा हेतू असून अयोध्या निकालाला पाठिंबा दर्शवत मी तेच करण्याचा प्रयत्न केला होता. गुलाम नबी आझाद यांनी देखील तुमच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला असून अतिशयोक्तीपूर्ण असल्याचे सांगितले आहे, असे विचारण्यात आले होते.

त्यावर खुर्शीद म्हणाले की, “धन्यवाद…याचा अर्थ गुलाम नबी आझाद माझे नेते आहेत. राहुल गांधी नाहीत? बरोबर ना? गुलाम नबी आझाद मोठे आणि आदरणीय नेते आहेत. जर ते अतिशयोक्ती असल्याचे सांगत असतील तर असावी असे मी समजतो. पण जर तुम्हाला हिंदुत्व काय करते हे बघायचे असेल तर माझ्या घऱाचा जळलेला दरवाजा बघा”

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1500 लोकांचा मृत्यू, 5 मिनिटांत बॉडी गायब; गडचिरोलीतील मृत्यूंबाबत राऊतांचा मोठा आरोप

मूड खराब झाल्यास मिळणार सुट्टी; भारतातही पॉलिसी राबवणार, उद्योगपतींचे संकेत

जरांगे प्रवास करत असलेल्या डिफेंडरवरून वाद; महागड्या गाडीतून जरांगेंचा आरक्षण दौरा

सरकारी-खासगी शाळा दिपकेंच्या रडारवर ; CJPचं शाळा सुधार आंदोलन

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारनं मराठा समाजासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT