PM Narendra Modi saam tv
देश विदेश

Congress : ...तर पंतप्रधान मोदींची हत्या करा; काँग्रेस नेत्याचं खळबळजनक विधान, VIDEO व्हायरल

राजा पटेरिया यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून व्हिडीओ समोर येताच, भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Congress Leader Raja Pateriya On PM Narendra Modi : संविधान वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करा, असं खळबळजनक विधान मध्यप्रदेश काँग्रेसचे माजी आमदार राजा पटेरिया यांनी केलं आहे. या त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पटेरिया यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून व्हिडीओ समोर येताच, भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. (Latest Marathi News)

मध्यप्रदेश काँग्रेसचे (Congress) माजी आमदार राजा पटेरिया हे रविवारी पन्ना येथील एका कार्यक्रमाला गेले होते. यावेळी त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधताना हे धक्कादायक विधान केलं आहे. त्यांच्या विधानाचा व्हिडीओ व्हायरल होताच, भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून त्यांच्यावर तातडीने कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, गृहमंत्री नरोत्तम मिश्रा, भाजपा प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा यांनी पटेरिया यांच्या या विधानाचा तीव्र निषेध केला आहे.

त्याचबरोबर गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या सूचनेनुसार, पन्ना पोलिसांनी पटेरिया यांच्याविरोधात शांतता भंग आणि असंतोष पसरवल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच, पटेरिया यांनी यू टर्न घेतला असून मी हत्येबद्दल बोललो नाही, तर पुढच्या निवडणुकीत मोदींचा पराभव करण्याबद्दल बोललो आहे, असं पटेरिया यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले राजा पटेरिया?

काँग्रेसचे माजी आमदार राजा पटेरिया हे रविवारी पन्ना येथील एका कार्यक्रमात गेले होते. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी पटेरिया म्हणाले, येणाऱ्या काळात पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) निवडणुका संपवतील, मोदी धर्म, जात, भाषेच्या आधारावर फूट पाडतील, दलित, आदिवासी, अल्पसंख्याकांचे जीव धोक्यात येतील, संविधान वाचवायचे असेल तर मोदींची हत्या करा, असं खळबळजनक विधान पटेरिया यांनी केलं.

दरम्यान, या विधानानंतर पटेरिया यांनी तत्काळ सारवासारव देखील केली. हत्या करा म्हणजे पराभव करा, असं पटेरिया यांनी म्हटलं. दरम्यान, पटेरिया यांच्या या विधानाचा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी तीव्र निषेध केला आहे. 'काँग्रेस मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदींशी स्पर्धा करू शकत नाहीत, म्हणून त्यांचा एक नेता पंतप्रधान मोदींना मारण्याची भाषा करत आहे. ही द्वेषाची पराकाष्ठा आहे, काँग्रेसच्या खऱ्या भावना आता समोर येत आहेत. अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. याबाबत गुन्हा दाखल केला असून आता कायदा आपलं काम करेल, असं शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नवी मुंबईतील तुर्भे एसटी बस आगारात भीषण आग

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT