Priyanka Gandhi joins Rahul Gandhi sit-in protest saam tv
देश विदेश

राहुल- प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात; काँग्रेस खासदारांचीही धरपकड

Congress Protest Over CJP Lathi-Charge: पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांनी धरणे आंदोलन केल्यामुळे दिल्लीतील राजकीय तणाव वाढलाय. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेदरम्यान अनेक काँग्रेस खासदारांना ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे.

Bharat Jadhav

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या घटनेच्या निषेधार्थ पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या मांडणारे काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह प्रियांका गांधी, अखिलेश यादव यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं. आक्रमक झालेल्या राहुल गांधींना पोलिसांनी थेट उचललं आणि बसमध्ये भरलं. त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र झालं आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे जोपर्यंत राजीनामा तोपर्यंत चर्चा होणार नाही. तसेच मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आणि CJP च्या आंदोलनादरम्यान झालेला लाठीचार्जच्या निषेधार्थ दिल्लीतील राजकारण तापलंय. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे पंतप्रधान निवासस्थान बाहेर रात्रभर आंदोलन करणार आहेत. त्यानंतर दिल्ली पोलीस यंत्रणेच्या सतर्क झाली असून पोलिसांनी राहुल गांधींना घेरलं आहे. तर ठिय्या आंदोलन करणाऱ्या काँग्रेस खासदारांची धरपकड केली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे पंतप्रधान निवासस्थान असलेल्या '७, लोक कल्याण मार्ग' येथे ठिय्या आंदोलन करत आहेत. त्यांच्यासोबत प्रियांका गांधी, जयराम रमेश आणि काँग्रेसचे इतर अनेक खासदारही उपस्थित होते.

आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांनी 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केलीय. यात त्यांनी आपण सरकाराकडे उत्तरे मागण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाकडे कूच करत आहोत. सरकारने आदल्या दिवशी विद्यार्थ्यांना क्रूरपणे वागणूक दिली. परंतु सरकार त्याची जबाबदारी स्वीकारण्यास किंवा संसदेत या मुद्द्यावर चर्चा होऊ देण्यास तयार नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलाय. यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली.

आंदोलनस्थळी मोठा फौजफाटा जमा झाला होता. दिल्ली पोलिसांनी आधी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर राहुल आणि प्रियंका यांनाही ताब्यात घेतलं. प्रियंका गांधी या बसच्या प्रवेशद्वारावरच उभ्या होत्या. महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना बसच्या आत नेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी त्यास नकार दिला. अखेरीस तीन-चार महिला अधिकाऱ्यांनी त्यांना पकडले आणि त्या प्रवेशद्वारावर उभ्या असतानाच त्यांना तिथून नेले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिरात विशेष दर्शन पाससाठी डिजिटल पेमेंट सुरू करण्याची मागणी

Auto Drivers Strike : मुंबईत परप्रांतिय चालकांचा संप, ३ दिवस रिक्षा-टॅक्सी बंद; कारण ऐकून तुम्हालाही राग येईल

Pune Crime: पुण्यात गोळीबाराचा थरार! बायकोसोबत टोकाचा वाद, नवऱ्याने स्वत:वरच झाडली गोळी

Kas Pathar Flower Festival 2026: कास पठारचं खुलणारं सौंदर्य, 'फुलोत्सव' लवकरच; ऑनलाईन बुकिंग कशी कराल आणि पैसे किती ? जाणून घ्या

मराठी भाषेचा ज्ञानवृक्ष कोसळला! मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली; शिक्षण क्षेत्रात शोककळा

SCROLL FOR NEXT