Family members mourn the untimely death of Pranav Singh, son of Congress leader Pramod Singh, who died in a tragic road accident. Saam Tv
देश विदेश

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याच्या मुलाचा रस्ते अपघातात जागीच मृत्यू, राजकीय वर्तुळात शोककळा

Son Of Congress Leader Dies In Road Accident India: काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष डॉ. प्रमोद सिंह यांच्या मुलाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. प्रणव सिंह हा बीटेक विद्यार्थी असून त्याच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

Omkar Sonawane

काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर प्रमोद सिंह यांच्या मुलाचे रस्ते अपघातात निधन झाले आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या महितीनुसार, प्रणव सिंह हा लवली प्रोफेशनल युनिवर्सिटी, फगवाडा (लुधियाना) मध्ये बीटेकचे शिक्षण घेत होता. शनिवारी रात्रीच्या सुमारास प्रणव सिंहचा अपघात झाला आणि यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळताच काँग्रेस आणि कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली. सांगितले जात आहे की, डॉक्टर प्रमोद सिंह हे आसाममध्ये गुवाहाटी येथील कामाख्या देवीच्या दर्शनाला चालले होते. जशी त्यांना मुलाच्या निधनाची माहिती मिळताच क्षणी ते गुवाहाटीवरून माघारी परतले.

सोमवारी दुपारी प्रणवचे पार्थिव हे आणले गेले. पार्थिव दाखल होताच कुटुंबियांचा आक्रोश पाहायला मिळाला. यावेळी स्थानिकांनी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी कुटुंबियाचे सांत्वन केले. माजी आमदार नदीम जावेद, सत्यविर सिंग, मोहम्मद आरीफ, मंगला गुरु आणि कॅप्टन मिश्रा यांच्यासह इतर अनेक प्रमुख व्यक्ति उपस्थित होत्या.

त्यांनी दिवंगत आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थना केली प्रणव सिंहच्या निधनाने काँग्रेस नेते प्रमोद सिंह यांच्या कुटुंबात मोठी पोकळी निर्माण झाली असून राजकीय वर्तुळात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'शुद्धीकरण तर कोणाला लग्नाचं आमिष'; अशोक खरात लैंगिक अत्याचारासाठी वापरायचा वेगवेगळ्या क्लृप्त्या; ५ वा गुन्हा दाखल

Maharashtra Live News Update: वसंत मोरे यांचा अटक पूर्व जामीन अर्ज पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने नाकारला

Viral: नारंगी केसाच्या मूर्ख माणसाने...! गॅस टंचाईवर पुण्यातील हॉटेलने लावलेली नोटीस व्हायरल

Hidden Beach In konkan : कोकणात गर्दीपासून दूर लपलेले निसर्गसौंदर्य, 'हा' समुद्रकिनारा उन्हाळी सुट्टीसाठी परफेक्ट डेस्टिनेशन

Cricket News : २ दिग्गज क्रिकेटपटूंना जीवे मारण्याची धमकी; बंदिस्त जागेत होणाऱ्या PSL वर संकटाचे काळे ढग

SCROLL FOR NEXT