Rahul Gandhi News  Saam tv
देश विदेश

Video : अदानी वादावरून राहुल गांधी यांचा नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल; व्हिडिओ पाहाच

काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांचा लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Shivaji Kale

Rahul Gandhi News : काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांचा लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. अदानी समूह प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. 'उद्योजक गौतम अदानी यांचा कमी काळात इतका विकास कसा झाला. नरेंद्र मोदी आणि गौतमी अदानी यांचा संबंध काय, असा सवाल करत लोकसभेत राहुल गांधी यांनी मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. (Latest Marathi News)

काँग्रेसचे वरिष्ठ नेते यांनी अदानी समूह प्रकरणावरून मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. 'मला भारत जोडो यात्रेत एकच नाव ऐकायला मिळालं ते नाव म्हणजे अदानी.... मला दोन-तीन प्रश्न विचारले जायचे. हा व्यक्ती कोणताही व्यवसायात घुसतो आणि तो व्यवयाय यशस्वी होतो. अगोदर हे एक-दोन व्यवसायात काम करत होते. आता आठ ते १० मध्ये काम करत आहे. २०१४ साली अदानी ६०९ व्या क्रमांकावर होते. अदानी आणि देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काय नातं आहे, असा खडा सवाल राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभेत केला.

'जेव्हा नरेंद्र मोदी २०१४ साली दिल्ली येतात. तेव्हा खरी जादू सुरू झाली. २०१४ साली अदानी ६०९ व्या नंबरवर होते. काही दिवसांपूर्वी ते तिथून दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले होते. इतक्या कमी काळात इतका विकास? असा सवाल राहुल गांधी यांनी केला. पंतप्रधान ऑस्ट्रेलियाला जातात. जादूने 100 कोटींचे कर्ज स्टेट बँक ऑफ इंडिया अदानी यांना देते. पंतप्रधान बांग्लादेशला जातात. त्यानंतर बांग्लादेशात वीज विकण्याचं ठरवलं जातं. १५०० मेगा वॅटचं कंत्राट अदानीला २५ वर्षासाठी दिलं जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांनी अदानी यांना वीजेचं कंत्राट देण्यासाठी दबाव टाकल्याचं राजपक्षे यांनी सांगितलं, असे राहुल गांधी पुढे म्हणले.

'यात्रेत मला लोकांनी विचारलं की अदानीला एवढ्या मोठ्या प्रमाणात मदत केली का केली जात आहे. 27 हजार कोटी एसबीआयस, 7 हजार कोटी पीएनबी, 5 हजार कोटी बँक ऑफ बडोदा, 36 हजार कोटी एलआयसी, 3 कोटी आणि दुसरे पीएसयू बँके खातेदारांचे पैसे अदानीला देण्यात आले आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: सांगलीत कोणत्या मतदारसंघात कोण आघाडीवर?

Vidhan Sabha Election Results : सुरुवातीच्या कलात भाजपने गाठलं शतक!

Naga Chaitanya Birthday : नागा चैतन्य 'या' अभिनेत्रीला किस करताना घाबरला, स्वतः सांगितला होता किस्सा

Assembly Result : काही तरी मोठी गडबड आहे, महाराष्ट्राच्या सध्याच्या निकालावर ठाकरे गटाच्या नेत्याला शंका

Tanvi Mundle Age: मराठमोळ्या अभिनेत्रीचं खरं वय किती, प्रसिद्ध मालिकेत करतेय काम

SCROLL FOR NEXT