Mallikarjun Kharge on PM Post And Power Latest News SAAM TV
देश विदेश

Opposition Meeting in Bengaluru : सत्ता किंवा पंतप्रधानपदामध्ये काडीमात्र रस नाही; काँग्रेसची स्पष्ट भूमिका

Mallikarjun Kharge in Opposition Meeting in Bengaluru : काँग्रेसला सत्ता किंवा पंतप्रधानपदामध्ये कोणताही रस नाही, असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केलं.

Nandkumar Joshi

Mallikarjun Kharge in Opposition Meeting in Bengaluru : काँग्रेसला सत्ता किंवा पंतप्रधानपदामध्ये कोणताही रस नाही, असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केलं. विरोधी पक्षांच्या बैठकीत खरगे बोलत होते.

कर्नाटकची राजधानी बेंगळुरूत मंगळवारी विरोधी पक्षांची बैठक सुरू आहे. बैठकीचा आजचा दुसरा आणि अखेरचा दिवस आहे. या बैठकीत सहभागी होण्यासाठी २६ पक्षांचे नेते (Opposition Leaders) बेंगळुरूत पोहोचले आहेत.

एएनआय वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, बेंगळुरूत विरोधी पक्षांची संयुक्त बैठक सुरू आहे. एमके स्टॅलिन यांच्या वाढदिवशी चेन्नईत माध्यमांशी बोलताना मी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेसला सत्ता किंवा पंतप्रधानपदामध्ये काहीही रस नाही. सत्ता मिळवणं हा आमचा उद्देश नाही. संविधान, लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय आदींचं संरक्षण करणं हा आमचा मूळ उद्देश आहे, असं खरगे म्हणाले. (Opposition Meeting in Bengaluru)

2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीआधी (Loksabha Elections 2024) रणनीतीवर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षांची बैठक होत आहे. या बैठकीत सत्ता आणि पंतप्रधानपदाबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. काँग्रेसला सत्ता किंवा पंतप्रधानपदामध्ये अजिबात 'इंटरेस्ट' नाही. सत्ता मिळवणे हा या बैठकीत सहभागी होण्यामागचा उद्देश नाही. संविधान, लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्यायाचं संरक्षण करणं हा हेतू आहे, असं खरगे म्हणाले.

राज्य पातळीवर विरोधी पक्षांमध्ये मतभेद असल्याचंही मल्लिकार्जुन खरगेंनी (Mallikarjun Kharge) मान्य केलं. पण मतभेद विचारधारेशी संबंधित नाही, असंही त्यांनी स्पष्ट केले. महागाईचा मार झेलणारा मध्यम वर्गीय आणि सर्वसामान्य, बेरोजगारीशी झुंजणारा तरूण, गरीबांच्या समस्यांपेक्षा हे पक्षांमधील मतभेद मोठे नाहीत, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, ''२६ विरोधी पक्षांची एकजूट या बैठकीतून दिसून आली आहे आणि ११ राज्यांमध्ये ते सत्तेत आहेत. भाजपला ३०३ जागा एकट्याच्या जोरावर जिंकता आल्या नाहीत. त्यांनी आपल्या घटकपक्षांच्या मतांचा वापर केला आणि सत्तेत आले. त्यानंतर त्यांनाही सोडून दिले. सद्यस्थितीत भाजप अध्यक्ष आणि पक्षाचे नेते आपल्या जुन्या सहकाऱ्यांशी समझोता करण्यासाठी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात धावाधाव करत आहेत.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT