Karnataka Election Final Result 2023 saam tv
देश विदेश

Karnataka Election Result 2023: कर्नाटकातच काँग्रेसच किंग! भाजपचा सुपडा साफ; येथे पाहा अचूक निकाल

Karnataka Election Final Result 2023: 224 जागांच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 113 हा बहुमताचा आकडा आहे. त्याच्या खूप पुढे काँग्रेस सर्वात मोठा पक्ष बनला आहे.

Chandrakant Jagtap

Karnataka Assembly Election Result 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. आतापर्यंत 224 पैकी 223 जागांचे निकाल हाती आले आहेत. काँग्रेसने कर्नाटकात भाजपचा सुपडा साफ केला आहे. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. 224 जागांच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 113 हा बहुमताचा आकडा आहे. त्याच्या खूप पुढे जात 135 जागांवर विजय मिळवत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष बनला आहे, तर विजयाचा दावा करणाऱ्या भाजपला कर्नाटकच्या जनतेने नाकारलं आहे. भाजपची 65 जागांवर घसरगुंडी झाली आहे.

याशिवाय सुरुवातीला जनता दल सेक्यूलर या निवडणुकीत किंगमेकर ठरले असे वाटत होते. मात्र नंतर त्यांच्याही जागा कमी झाल्या. जेडीएसला या निवडणूकीत कर्नाटकच्या जनतेने फक्त 19 जागांवर विजय मिळवून दिला. यामुळे भाजप आणि जेडीएसची पिछेहाट झाली आहे. इतर पक्षांना या निवडणुकीत 4 ठिकाणी विजय मिळाला आहे.

४३ टक्के मतं घेत भाजपला धोबीपछाड

पक्षनिहाय मतांची विभागणी केल्यास या निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक ४२.९८ टक्के मते मिळाली, तर भाजपला ३५.९१ टक्के मते मिळाली आहेत. याशिवाय जेडीएसला १३.३३ टक्के मतं मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसला ०.२७ टक्के आणि नोटाला ०.६९ टक्के मतं मिळाली आहेत.

'भारत जोडो' यात्रा ठरली 'गेमचेंजर

राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेचा कर्नाटकमध्ये मोठा प्रभाव दिसला आहे. भारत जोडो यात्रा विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी या लढाईत राहुल गांधींची पदयात्रा विजयी ठरली असा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे. कर्नाटकातील 20 विधानसभा मतदारसंघांपैकी ज्या मतदार संघातून राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा गेली. त्यापैकी 15 मतदारसंघ काँग्रेसने जिंकले. जेडीएसने 3 तर भारतीय जनता पक्षाने २ जागा जिंकल्या आहेत. (Latest Political News)

2018 च्या विधानसभा निवडणुकीत या 20 जागांपैकी काँग्रेसला फक्त 5 जागा मिळाल्या होत्या.भारत जोडो यात्रा कर्नाटकातील काँग्रेससाठी 'संजीवनी' ठरली आहे. या यात्रेमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला होता. ज्यामुळे निवडणूक विजयात मदत झाली, असे पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांचे मत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : नव्या लाडकींना लाभ मिळणार का? पोर्टल कधी सुरू होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update : सोमठाणा गावात स्मशानभूमी नसल्याने गावकऱ्यांनी प्रेत ठेवले थेट ग्रामपंचायतमध्ये

आंदोलनानंतर बँकांची मराठींसाठी मेगाभरती? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Maharashtra Politics : निवडणुकीआधी अजित पवारांची ताकद वाढली, एकाचवेळी ४०० कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Mumbai Crime : मुंबईत रिक्षा चोरांचा सुळसुळाट; ७ ऑटोरिक्षा रस्त्यावरून लंपास, पोलिसांकडून दोघांना अटक

SCROLL FOR NEXT