congo river boat fire update news social media
देश विदेश

Congo River boat fire : ५०० प्रवाशांना घेऊन निघालेल्या बोटीला भीषण आग, कांगो नदीत जलसमाधी; १५० प्रवासी मृत्युमुखी

Congo boat fire latest update : कांगो नदीत बोट दुर्घटनेत १४८ जणांचा मृत्यू झाला आहे. आग लागल्यानंतर बोट बुडाली. या दुर्घटनेत शेकडो प्रवासी बेपत्ता झाले आहेत.

Nandkumar Joshi

डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये मोटारवर चालणाऱ्या भलीमोठ्या लाकडी बोटीला जलसमाधी मिळाली. बोटीला आग लागल्यानंतर ती नदीत उलटली. यात १४८ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर अनेक प्रवासी बेपत्ता झाले आहेत. या बोटीतून जवळपास ५०० जण प्रवास करत होते.

कांगो नदीत ही भयंकर दुर्घटना घडली. दुर्घटनाग्रस्त बोटीमध्ये अंदाजे ५०० प्रवासी होते. आग लागल्यानंतर ही बोट उलटली. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, आतापर्यंत १४८ जण मृत्युमुखी पडले आहेत. आफ्रिका खंडातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी असलेल्या कांगो नदीत ही दुर्घटना घडली.

आधी आग लागली, नंतर जलसमाधी

कांगो नदीत ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली. लाकडापासून तयार केलेल्या मोटारबोटीला अचानक आग लागली. त्यानंतर काही मिनिटांतच ही बोट उलटली. ही बोट मतानकुमू बंदराकडून बोलोंबाच्या दिशेने निघाली होती.

स्वयंपाक तयार करतानाच भडका

एक महिला बोटीवर स्वयंपाक करत होती. त्यावेळी उडालेल्या एका ठिणगीमुळं आग लागली. काही क्षणांतच आगीनं रौद्ररूप धारण केलं. बघता बघता ही आग अख्ख्या जहाजावर पसरली, अशी माहिती नदी सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

व्हिडिओ व्हायरल

या भयावह दुर्घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दुर्घटनाग्रस्त बोटीत असलेल्या काही प्रवाशांनी आग लागल्यानंतर नदीत उड्या मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. रॉयटर्सच्या माहितीनुसार, घटना घडली त्यावेळी या बोटीत ५०० प्रवासी होते. आग लागल्यानंतर बोटीवर गोंधळ उडाला. काही प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी नदीत धडाधड उड्या मारल्या. अनेकांना पोहता येत नसल्याने त्यांचा मृत्यू झाला.

शेकडो होरपळले, पण मदत नाही

या बोट दुर्घटनेत आतापर्यंत १५० जण गंभीररित्या होरपळले आहेत. मात्र, त्यांना सुरुवातीला कोणत्याही प्रकारची वैद्यकीय किंवा इतर मदत मिळालेली नाही. यातील १०० जणांना मबांडाका येथील टाउन हॉलमध्ये तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या केंद्रात ठेवले आहे. मात्र, तेथील सुविधा अपुऱ्या आहेत. गंभीररित्या भाजलेल्या काही प्रवाशांना रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र, तिथेही गैरसोय होत आहे, अशी माहिती स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रामदास आठवले यांनी पैठण तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Navratri Remedies: नवरात्रीत सुपारीच्या पानांचा करा खास उपाय, मिळेल नोकरी व व्यवसायात यश

Today Gold Rate: नवरात्रीत सोन्याला पुन्हा झळाली; १० तोळ्यामागे ३००० रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

Bigg Boss 19: नेहलची री-एन्ट्री, तान्याची पोलखोल, फरहाना - गौरवची कॅप्टनशिपसाठी भांडण; काय घडलं बिग बॉसच्या घरात

GK: एक ट्रेन चालवण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या सर्व माहिती

SCROLL FOR NEXT