Corona India: "या" राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन! Saam Tv
देश विदेश

Corona India: "या" राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन!

वाढत्या कोरोना प्रकरणांमध्ये केरळ सरकारची चिंता वाढली आहे. राज्यात दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाउन सरकारने जाहीर केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तिरुअनंतपुरम: वाढत्या कोरोना Corona प्रकरणांमध्ये केरळ Kerala सरकारची चिंता वाढली आहे. राज्यात दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाउन सरकारने जाहीर केला आहे. केरळमध्ये 31 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान संपूर्ण निर्बंध लागू केले जातील.

कोरोनाची प्रकरणे पुन्हा एकदा वाढू लागली आहेत. गेल्या 20 दिवसांत, गेल्या 24 तासांत सर्वाधिक घटना घडल्या आहेत. देशभरात येत असलेल्या एकूण प्रकरणांपैकी ५० टक्के प्रकरणे केरळमधील असून त्यानंतर केरळमध्ये लॉकडाउन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केरळ मधून कोरोनाची दुसरी लाट अद्याप गेलेली नाही. ५०% कोरोनाची अधिक प्रकरणे केरळ, महाराष्ट्र आणि ईशान्य या राज्यांमधून येत आहेत. दुसरे लाट वाढल्यानंतर कोरोनाची प्रकरणे कमी होऊ लागली, ज्या प्रकारे प्रकरणे कमी होत गेली, तो वेग आता थांबला आहे.

८० टक्के केरळ, महाराष्ट्र आणि उत्तर पूर्वमधील आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, दररोज ४ लाख प्रकरणे कमी होऊन २ लाखांवर येण्यास २६ दिवस लागले. २ लाख प्रकरणांमधून १ लाखावर येण्यास ११ दिवस लागले. दररोज १ लाख पासून ५० हजार प्रकरणे होण्यासाठी २० दिवसांचा कालावधी लागला. परंतु आता गेल्या ३१ दिवसांपासून ३० ते ४० हजारांच्या दरम्यान नवीन प्रकरणे समोर येत आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार बुधवारी आलेल्या आकडेवारीतील ८० टक्के प्रकरणे केरळ, महाराष्ट्र आणि ईशान्य या राज्यांतील आहेत.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Election : महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? भाजप उमदेवाराच्या प्रचाराला शिंदेसेनेचा नकार, गोरेगावमध्ये नेमकं काय सुरु?

Maharashtra Weather : थंडीची चाहुल लागताच 'या' जिल्ह्यांवर पावसाचं सावट, हवामानाचा आजचा अंदाज काय?

Sharad Pawar: 'गद्दार गणोजीला सुट्टी नाही'; मुंडे-भुजबळांनतर शरद पवार यांचा दिलीप वळसेंवर प्रहार

Today Horoscope: अचानक हाती पैसा मिळेल, पगारवाढ होण्याची शक्यता; वाचा तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT