कॉकरोज (Cockroach Janata Party) जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपकेला अटकेची भीती वाटू लागली आहे. पक्षाच्या धोरणांमुळे आणि सोशल मीडियावर वाढणाऱ्या लोकप्रियतेमुळे भारतातील दिल्ली विमानतळावर उतरताच दिल्ली पोलीस अटक करतील असं अभिजीत दीपके म्हणाला. गेल्या आठवड्यात उदयास आलेल्या या पक्षाने फॉलोअर्सच्या संख्येत भारतीय जनता पक्षाला (भाजप) वेगाने मागे टाकले आहे.
द रेड माइक'ला दिलेल्या मुलाखतीत अभिजीत म्हणाला, "या देशात (भारतात), जिथे आमच्याकडे झुरळांसारखे पाहिले जाते, तिथे आम्हाला अखेर आमची ओळख सापडली आहे." इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या बाबतीत 'कॉकरोच जनता पार्टी'ने भाजपला मागे टाकल्याबद्दल बोलताना तो म्हणाला, "आमचे फॉलोअर्स वाढले याचा मला आनंद नाही. त्याचे काय होणार? समस्या तर तशाच राहणार आहेत."
कॉकरोच जनता पक्षाचे 'X' अकाउंट गुरुवारी (२१ मे, २०२६) भारतात निलंबित करण्यात आले. अभिजीत दीपके यांनी आपल्या 'X' अकाउंटवर दिसणाऱ्या पॉप-अपचा फोटो शेअर करत लिहिले, "अपेक्षेप्रमाणे, कॉकरोड जनता पक्षाचे खाते भारतात निलंबित करण्यात आले आहे." "मला असे वाटते की, दिल्ली विमानतळावर उतरल्या उतरल्या दिल्ली पोलिसांचा ताफा मला तिहार तुरुंगात घेऊन जाईल.",असंही त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
अमेरिकेत स्थायिक होण्यापूर्वी ते डिजिटल राजकीय संदेश, स्टोरी टाकणं आणि ऑनलाइन प्रचार रणनीती आखण्याचं काम अभिजीत दीपके करायचा. त्याने पुण्यातून पत्रकारितेची पदवी मिळवली. फक्त चार दिवसांपूर्वी सुरू झालेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आता १२ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. हे भाजपच्या याच प्लॅटफॉर्मवरील ८.७ दशलक्ष फॉलोअर्सपेक्षा खूप जास्त आहेत. पक्षाला महुआ मोईत्रा, कीर्ती आझाद, अखिलेश यादव यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांचा पाठिंबा मिळाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.