Gas Price Hike News Latest Update  SAAM TV
देश विदेश

Gas Price Hike News : महागाईचा मार सुरूच; 8- 12 रुपयांनी महागणार CNG, घरगुती गॅसचाही भडका उडणार

सर्वसामान्यांना महागाईचा झटका देणं सुरूच आहे. CNG आणि स्वयंपाकाचा गॅसही आता महागणार आहे.

Nandkumar Joshi

Gas Price Hike News Latest Update : नॅचरल गॅसच्या दरात विक्रमी वाढ झाल्यानंतर CNG प्रतिकिलो ८ ते १२ रुपयांनी वाढू शकतं. तर स्वयंपाकाचा गॅस (PNG) च्या किंमती ६ रुपये प्रति युनिटने वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या क्षेत्रातील जाणकारांनी हा अंदाज व्यक्त केला आहे.

१ ऑक्टोबरपासून नैसर्गिक गॅसचे दर वाढले आहेत. त्यामुळे सीएनजी (CNG) आणि पीएनजी (PNG) चे दर आणखी वाढू शकतात. गॅसच्या किंमतीत ४० टक्क्यांपर्यंतची वाढ झाली आहे. त्यानंतर सीएनजी आणि पीएनजीचे दर वाढणे अपरिहार्य आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे. (Breaking Marathi News)

संपूर्ण जगभरात ऊर्जा क्षेत्रावर मोठं संकट कोसळल्याचं पाहायला मिळतं. विशेषकरून युरोपात ते अधिक जाणवतं. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळं गॅसच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाल्याचे बघायला मिळत आहे. यापासून भारताची देखील सुटका झालेली नाही.

भारतात गॅसचे दर महागण्याचे आणखी एक कारण सांगितले जाते. सरकारने मागच्या आठवड्यात जुन्या गॅस युनिटमधून उत्पादित गॅस (APM Gas) साठी दिल्या जाणाऱ्या दरात वर्तमान ६.१ डॉलर प्रति मिलियन ब्रिटिश थर्मल युनिटमध्ये वाढ करून ८.५७ डॉलर प्रति युनिट केलं आहे. तर अडचणीच्या युनिट्समधून उत्पादित गॅसच्या किंमती ९.९२ डॉलर प्रति युनिटवरून १२.६ डॉलर प्रति युनिटपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. याच दराच्या आधारे देशात उत्पादित गॅसचा जवळपास दोन तृतीयांश वाटा विकला जातो.

नैसर्गिक गॅस फर्टिलायझर निर्मितीसह वीज निर्मितीसाठी लागणारा प्रमुख कच्चा माल आहे. ते सीएनजीत परावर्तित केले जाते. तसेच पाईपद्वारे (पीएनजी) स्वयंपाक घरात वापरला जातो. जाणकारांच्या मते, जुन्या गॅस उत्पादन करणाऱ्या युनिट्समध्ये उत्पादित केलेल्या गॅसच्या किंमती केवळ एका वर्षात जवळपास पाच पट वाढल्या आहेत. मागील वर्षभरात याचे दर १. ७९ प्रति एमएमबीटीयूवरून सप्टेंबर २०२१ पर्यंत ८.५७ डॉलरपर्यंत पोहोचले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indurikar Maharaj Age: प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज याचं वय किती? माहितीये का?

DNAचे जनक शास्त्रज्ञ जेम्स वॉटसन यांचं निधन; ९७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Live News Update: ठाकरे गट व भाजपच्या कार्यकर्त्यात धाराशिव पंचायत समिती कार्यालयात तुफान राडा

Gold Price Today: आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या दरात घसरण, खरेदीची सुवर्णसंधी; वाचा १८- २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Dementia Risk: ३५ ते ४५ वयात ह्रदयविकाराचा झटका आल्यावर वाढतो मेंदूचा आजार? नक्की खरं काय? रिसर्च काय सांगतं?

SCROLL FOR NEXT