Yogi Adityanath on PM Race 
देश विदेश

पंतप्रधान होणार की मुख्यमंत्रीच राहाणार? योगी आदित्यनाथ यांनी पहिल्यांदाच दिली थेट कबुली; राजकीय वर्तुळात खळबळ

Yogi Adityanath on PM Race : 2027 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधानपदाच्या चर्चेवर भाष्य केले. भविष्यातील राजकीय वाटचाल आणि उत्तर प्रदेशच्या विकासाबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Namdeo Kumbhar

Yogi Adityanath response on becoming Prime Minister : उत्तर प्रदेशात भाजपकडून २०२७ च्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे २०२९ मध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देशाचे पंतप्रधान होणार का? याविषयी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. या सगळ्या चर्चांवर पहिल्यांदाच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं आहे. 'द स्टेट्समन' या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत योगी आदित्यनाथ यांनी भविष्यातील राजकीय वाटचालीवर भाष्य केले.

पंतप्रधानपदाच्या शर्यतीवर योगी आदित्यनाथ काय म्हणाले?

मुलाखतीत योगी आदित्यनाथ यांना '२०२७ नंतर तुम्ही स्वतःला देशाच्या पुढच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत पाहता का?' असा थेट प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाने माझ्यावर उत्तर प्रदेशातील जनतेची सेवा करण्याची मोठी जबाबदारी दिली आहे. माझा संपूर्ण भर यूपीला आर्थिक आणि प्रशासकीयदृष्ट्या पुढे नेण्यावरच आहे."

सार्वजनिक जीवनात काम करताना 'राष्ट्र प्रथम' (देश आधी) हेच आपलं धोरण राहिलं असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.

विधानसभा जागावाटपावर काय म्हणाले?

२०२७ च्या निवडणुकीत महायुतीच्या (NDA) जागावाटपाबाबत विचारलं असता, तो पक्षाच्या संघटनेचा विषय असून मुख्यमंत्री म्हणून सरकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणं हेच आपलं मुख्य काम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

अयोध्येतील गर्दी आणि विकासाचा लेखाजोखा :

राम मंदिराच्या उभारणीनंतर अयोध्येला भेट देणाऱ्या भाविकांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याचे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. ते म्हणाले की, महाकुंभाच्या वेळी तब्बल ६६ कोटी लोकांनी प्रयागराजला भेट दिली होती. हा विकास आरोग्य किंवा शिक्षण बजेटमध्ये कपात करून झालेला नाही.

"जे सरकार वारसा जतन करत आहे, तेच विकासालाही प्राधान्य देत आहे. आम्ही एन्सेफलायटीससारख्या गंभीर आजारांवर मात केली, वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार केला आणि आज राज्यात ८० वैद्यकीय महाविद्यालये कार्यरत आहेत," अशी माहितीही त्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जंतर मंतरवर राजकीय नेत्यांची धरपकड; 4 माजी मुख्यमंत्री दिल्ली पोलिसांच्या ताब्यात

नाशिकमधील धक्कादायक घटना; 22 मृत रुग्णांवर 6 वर्षानंतर उपचार; 3 हॉस्पिटल्सनं शासनाला लावला 2 कोटींचा चुना

Maharashtra News Live Update: मुंबईत ताब्यात घेतलेल्या ६०० आंदोलकांची सुटका

Chaniya Choli Designs: गरबा नाईटमध्ये सर्वांच्या नजरा तुमच्यावर खिळतील! ट्राय करा हे ७ चनिया चोळी डिझाइन्स

महायुतीवर संकट; फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याविरोधात मराठा शक्ती एकवटली; थेट मुख्यमंत्र्यांकडे राजीनाम्याची मागणी

SCROLL FOR NEXT