CM Eknath Shinde Visits Delhi Before Ashadi Wari with Deputy Cm Fadnavis will Meet PM Modi Facebook/@mieknathshinde
देश विदेश

CM Eknath Shinde Delhi Visit: आषाढी वारीच्याआधी मुख्यमंत्र्यांची 'दिल्ली वारी'; पंतप्रधानांनाही भेटणार

CM Eknath Shinde Delhi Visit News: या भेटीत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपतींना, गृहमंत्र्यांना आणि जे. पी. नड्डा यांना विठ्ठल रखुमाईची मुर्त्या भेट म्हणून दिल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

नवी दिल्ली: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणून दिल्लीला (New Delhi) गेले आहेत. यावेळी दिल्लीत त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या स्वतंत्र्यपणे भेटी घेतल्या. आषाढी एकादशीच्या एक दिवस आधी झालेल्या या भेटीत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपतींना, गृहमंत्र्यांना आणि जे. पी. नड्डा यांना विठ्ठल रखुमाईची मुर्त्या भेट म्हणून दिल्या आहेत. आज संध्याकाळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील दिल्ली दौऱ्यावर आहेत. (CM Eknath Shinde Latest News)

हे देखील पाहा -

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन एक आठवडा झाला आहे, पण अजूनही इतर मंत्र्यांचा शपथविधी झालेला नाही. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आषाढी एकादशीआधीच होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. रविवारी आषाढी एकादशी असल्यामुळे एकनाथ शिंदे पंढरपूरला शासकीय पुजेसाठी जाणार आहेत, त्याआधी मंत्रिमंडळ विस्ताराबाबब चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले आहेत.

असा असेल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा

सकाळी - १०:३० वाजता राष्ट्रपतींची भेट

सकाळी - ११:३० वाजता जे. पी. नड्डांची भेट

दुपारी - १२:०० वाजता संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट

दुपारी - ४:३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

दुपारी - १ ते ४ दरम्यान पत्रकार परिषदेची शक्यता

संध्याकाळी - ६ वाजता एअरपोर्टवर

मुख्यमंत्र्यांच्या पंढरपूर दौऱ्यावर निवडणूक आचारसंहितेचे सावट

विठ्ठल रखुमाईच्या शासकीय पूजेचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे, पण काल निवडणूक आयोगाने ९२ नगरपरिषदांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. त्यामुळे आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे. आचारसंहितेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा पंढरपूर दौरा अडचणीत आला आहे. निवडणूक आयोगाच्या परवानगी नंतरच निवडणूक आयोगाच्या परवानगी नंतरच एकनाथ शिंदे यांचा पंढरपूर दौरा पार पडणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची परवानगी घेण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पंढरपूर मधील शासकीय पूजेचे कार्यक्रम पार पडतील अस सांगण्यात येत आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: छगन भुजबळांच्या विजयाचा मोठा जल्लोष; जेसीबीतून फुलांचा वर्षाव

Longest River In Maharashtra: महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पवित्र तीर्थस्थान म्हणून ओळख

Vidhan Sabha Election Result : रायगड जिल्ह्यात महायुतीची सरशी; महाविकास आघाडीच्या हाती भोपळा

Maharashtra Election Result: उल्हासनगरात राष्ट्रवादीला जबर धक्का! भाजपच्या कुमार आयलानींचा मोठा विजय

Sunil Tatkare: खरी राष्ट्रवादी कोणती? अखेर जनतेनं उत्तर दिलचं, सुनिल तटकरेची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT