Eknath Shinde News : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाबाबत महत्त्वाची बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित होते. या बैठकीत नेमकं काय झालं, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर सांगितलं आहे. (Latest Marathi News)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीनंतर प्रसारमाधमांशी संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, 'आज, बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानतो. आज बैठकीत मी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित होते. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सीमावादावर राज्यातील जनतेला त्रास होऊ नये आणि मराठी माणासांना त्रास होऊ नये, अशी भूमिका राज्य सरकारची होती'.
'गृहमंत्री महोदय अमित शाह आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी देखील मान्य केलं. दोन्ही राज्यात शांततेचं वातावरण आणि कोणत्याही प्रकारचं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ नये, याबाबत सूचना केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी दिल्या', असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, 'आता स्पष्ट झाले आहे की, तीन-तीन मंत्र्यांची समिती गठीत होईल. मराठी शाळा, मराठी भाषा, मराठी माणसाचे कार्यक्रमावरून कोणावरही अन्याय होऊ नये, अशी भूमिका मांडली आहे. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण आहे. त्याचा अवमान होऊ नये याची काळजी दोन्ही राज्यांनी घेतली पाहिजे, अशी भूमिका अमित शाह यांनी मांडली. ही भूमिका दोघांनी स्वीकारली. तसेच ट्विटरवरील विधानाबाबत चर्चा केली.त्यावेळी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ते ट्विटर त्यांचं नसल्याचं सांगितलं'.
'कुणीतरी या वादात आगीत तेल ओतण्याचं काम करत आहे. सगळ्यांनी मिळून एकजुटीने राजकारण न करता मराठी माणसांच्या मागे उभे राहिले पाहिजे. आजची बैठक सकारात्मक झाली. दोन्ही राज्यांच्या नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी आम्ही घेणार आहोत, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.