Arvind Kejriwal Rouse Avenue Court ANI
देश विदेश

Arvind Kejriwal News : अरविंद केजरीवाल आज तुरुंगातून बाहेर येणार? आम आदमी पक्षाकडून जल्लोषाची तयारी सुरू

Arvind Kejriwal Liquor Policy Case : राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल आज तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे.

Satish Daud

कथित मद्य विक्री घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मोठा दिलासा मिळाला. दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने गुरुवारी (ता. २०) केजरीवाल यांना सशर्त जामीन दिला. इतकंच नाही, तर न्यायालयाने या निर्णयाला ४८ तासांसाठी स्थगिती देण्यासाठी ईडीने दाखल केलेली याचिका देखील फेटाळून लावली. त्यामुळे मुख्यमंत्री केजरीवाल आज तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, केजरीवाल यांच्या स्वागतासाठी आम आदमी पक्षाकडून जल्लोषाची तयारी सुरू करण्यात आली आहे. यावेळी शक्तीप्रदर्शन देखील केलं जाणार आहे. दिल्लीत नवीन अबकारी धोरण लागू करताना मोठा आर्थिक घोटाळा झाला, असा संशय ईडीला होता. याच संशयातून त्यांनी २१ मार्च रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली.

अटकेनंतर केजरीवाल यांनी तत्काळ जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने अर्ज फेटाळून लावत त्यांची रवानगी ईडी कोठडीत केली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. जामीन कालावधी पूर्ण झाल्यानंतर केजरीवाल यांनी २ जून रोजी तिहार तुरुंग प्रशासनासमोर आत्मसमर्पण केले.

देशात लोकशाहीची हत्या केली जात असून नरेंद्र-मोदी अमित शहा मनमानी करत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला होता. लोकशाही धोक्यात असल्याचं सांगत लोकसभा निवडणुकीत भाजपला तडीपार करा, असं आवाहन देखील केजरीवाल यांनी देशातील नागरिकांना केलं होतं. त्याचबरोबर मी जेलमधून लवकरच बाहेर येऊन झुंडशाहीविरोधात लढा देणार, असंही केजरीवाल यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, गुरुवारी केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवर दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू कोर्टात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने अंमलबजावणी संचालनालयाचे सर्व युक्तिवाद फेटाळून लावत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल आज शुक्रवारी तिहार तुरुंगातून बाहेर येऊ शकतात. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर केजरीवाल नेमकं काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

KDMC : कल्याणमधील कचरा संकलनाचा ठेका किती कोटींचा? अधिकाऱ्यांनाच ठाऊक नाही, पालिकेत नेमकं काय घडतंय?

Rohit Sharma : रोहित शर्माचं वाढलेलं पोट सपाट, 'हिटमॅन' झाला फीटमॅन

Yogesh Kadam on Ghaywal Gang : गुंड घायवळच्या भावाला शस्त्र परवाना कुणी दिला? मंत्री योगेश कदम यांनी केला खुलासा

SCROLL FOR NEXT