Cloudburst in Jammu & Kashmir Saam Tv News
देश विदेश

धो-धो पावसात आभाळ फाटलं; घर जमीनदोस्त, जोडपं अन् ५ मुलं ढिगाऱ्याखाली अडकले, झोपेतच मृत्यू

Cloudburst in Jammu and Kashmir: रियासी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे ढगफुटी झाली. एका कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू झाला. प्रशासन आणि स्थानिक लोकांनी बचावकार्य सुरू केलं.

Bhagyashree Kamble

  • रियासी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे ढगफुटी झाली.

  • एका कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू झाला.

  • प्रशासन आणि स्थानिक लोकांनी बचावकार्य सुरू केलं.

  • गावात शोककळा पसरली असून अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जम्मू काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार सुरू आहे. कोसळधारेमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशातच शुक्रवारी २९ ऑगस्टच्या रात्री ढगफूटी झाली. यात गावातील अनेकांचं नुकसान झालं आहे. तसेच एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली संपूर्ण कुटुंब अडकले होते. नंतर बचाव पथकाकडून रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं. मात्र, त्यांचा दबून मृत्यू झाला.

गावात ढगफूटी झाल्यानंतर गावात हाहाकार माजला. जनजीवन विस्कळीत झालं. ढगफूटीचा फटका एका कुटुंबाला बसला. घर कोसळलं. स्थानिक लोकांनी कोणताही विलंब न करता बचावकार्याला सुरूवात केली. बचावपथकानेही घटनास्थळी धाव घेतली. अनेक तासांच्या अथक परिश्रमानंतर ढिगारा काढण्यात आला.

मात्र, या ढिगाऱ्याखाली दबून एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू झाला. प्रशासनाकडून घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी परिसरात अलर्ट जारी केला आहे. इतर संभाव्य धोकादायक भागातून लोकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे.

स्थानिक आमदार माहुर मोहम्मद खुर्शीद यांनी पत्रकारांशी बोलताना दु:ख व्यक्त केलं आहे. ते म्हणाले, 'ही खूप दु:खाची बाब आहे. मी आजपर्यंत इतका मुसळधार पाऊस आणि वादळ पाहिले नव्हते. शुक्रवारी रात्री माझ्या परिसरातील एका घराला ढगफूटीचा तडाखा बसला. नझीर अहमद (वय वर्ष ३७), त्यांची पत्नी (वय वर्ष ३५) तसेच या जोडप्याच्या ५ मुलांसह मृत्यू झाला'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS : एलिसा हीलीची खेळी ठरली निर्णायक; रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला धूळ चारली

Dahisar Politics: युतीचा करिष्मा! महापालिका निवडणुकीपूर्वीच महायुतीला धक्का,शेकडो भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

Bardhaman Station : पश्चिम बंगालमध्ये रेल्वे स्टेशनवर मोठी दुर्घटना; अनेक प्रवासी जखमी, गर्दीचा धडकी भरवणारा व्हिडिओ समोर

Nilesh Ghaiwal: निलेश घायवळला ब्लू कॉर्नर नोटीस, पुणे पोलिसांनी टाकला मोठा डाव

Japan Declares Flu: ४ हजारांहून अधिक रुग्ण, जपानमध्ये शाळा बंद, रुग्णालये फुल्ल

SCROLL FOR NEXT