Massive Cloudburst In J&K saam Tv
देश विदेश

Jammu Kashmir Cloudburst: किश्तवाडमध्ये पुन्हा ढगफुटी; 10 जणांचा मृत्यू,बचाव कार्य सुरू

Cloudburst in J&K Kishtwar: हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर गुरुवारी चिशोती परिसरात ढगफुटीची घटना घडलीय. या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय.

Bharat Jadhav

  • जम्मू काश्मीरमधील किश्तवाडच्या चिशोती भागात ढगफुटी.

  • १० जणांचा मृत्यू, अनेक ठिकाणी पाणी पातळी वाढली.

  • नदी-नाल्यांमधून पूरस्थिती निर्माण.

  • बचाव कार्य सुरू, पावसाचा इशारा कायम.

उत्तर भारतात मॉन्सून पावसानं हाहाकार माजवलाय. डोंगराळ भागात ढगफुटीच्या घटना वारंवार घडत आहेत. जम्मूच्या किश्तवाड भागात ढगफुटीची घटना घडली असून यात १० जणांचा मृत्यू झालाय. घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. ढगफुटी झाल्यानंतर नदी आणि नाल्यांमधील पाणी पातळीत वाढ झालीय.

दरम्यान केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याची माहिती दिलीय. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, जम्मू-काश्मीरचे विरोधी पक्षनेते आणि तेथील आमदार सुनील कुमार शर्मा यांच्याकडून मिळआलेल्या माहितीनुसार पाडरच्या चसोती परिसरात ढगफुटी झालीय. आम्ही किश्तवाडचे उपायुक्त पंकज कुमार शर्मा यांच्याशी याबाबत चर्चा केलीय.

त्यानंतर तेथील प्रशासनाने बचाव कार्यास सुरुवात केली असून घटनास्थळी किती नुकसान झालं यांची माहिती घेत आहे. बचाव आणि उपचार व्यवस्था केली जात असल्याचं केंद्रीय मंत्री म्हणालेत. आज गुरुवारी मचैल यात्रेच्या मार्गात असलेल्या सुदूर गावात ढगफुटीची घटना घडलीय. यात १० जणांचा मृत्यू झालाय. ढगफुटी झाल्याने मंदिरकडील रस्त्यावर असलेल्या चशोती गावाला या ढगफुटीचा फटका बसलाय. या घटनेमुळे येथील वार्षिक यात्रा स्थगित करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यानं दिलीय.

दरम्यान जेथे ढगफुटीमुळे जेथे पाण्याचा पूर आला तेथे पार्किग होती. तेथेच मचैल येथे जाणाऱ्यांसाठी जेवण व्यवस्था करण्यात आली होती. देवीच्या दर्शनाला जाणारे अनेक भाविक येथे थांबत असतात. येथून पुढे मंदिरापर्यंत पायी जावे लागते. वाहने नेण्यासारखा येथे रस्ता नाहीये. त्यामुळे येथे वाहनांची पार्किगची सुविधा या ठिकाणी करण्यात आलीय. त्याचमुळे ढगफुटी झाली त्यावेळी मोठी गर्दी असावी असा अंदाज वर्तवला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुणे महापालिकेच्या मतदार यादींवर हरकतींचा पाऊस

मुंबईतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गेमचेंजर निर्णय; तब्बल ७ किमीचा भुयारी मार्ग तयार करणार, कसा असेल संपूर्ण प्रकल्प?

स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवारांची तोफ धडाडली, महाराष्ट्र पिंजून काढला

Raigad Politics: राष्ट्रवादी-शिवसेना संघर्ष टोकाला; मंत्री भरत गोगावले यांच्या मुलावर गुन्हा दाखल

IND vs SA ODI: डोंगराएवढी धावसंख्या करूनही टीम इंडियाचा दारूण पराभव; दक्षिण आफ्रिकेची मालिकेत १-१ ने बरोबरी

SCROLL FOR NEXT