CJP Protest Cases Withdrawn: Delhi Government Gives Major Relief to Protesters saam tv
देश विदेश

CJP आंदोलकांवरील गुन्हे मागे! दिल्ली सरकारचा मोठा निर्णय

NEET Protest Row: दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET (UG) परीक्षेतील कथित गैरव्यवहारांविरोधात झालेल्या CJP आंदोलनाशी संबंधित FIR मागे घेण्यास दिल्ली सरकारने मंजुरी दिली. आंदोलनात सहभागी विद्यार्थी आणि आंदोलकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Bharat Jadhav

दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनादरम्यान नोंदवण्यात आलेले एफआयआर रद्द करण्यास दिल्ली सरकारने मंजुरी दिलीय. या निदर्शनांमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांवर किंवा आंदोलकांवर कोणतीही दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाई केली जाणार नाही, असा दिलासा सरकारने दिला आहे. गृहमंत्रालयाचे मुख्य सचिव संतोष डी. वैद्य यांनी स्वाक्षरी केलेल्या अधिकृत परिपत्रकात नमूद केले आहे की, २९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत नीट परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांच्या विरोधात झालेल्या आंदोलनांशी संबंधित एकूण १३ गुन्हे दिल्ली पोलिसांनी दाखल केले होते.

दिल्ली सरकारचा आदेश काय?

देशाची राजधानी दिल्ली क्षेत्रात झालेल्या आंदोलनात जे लोक सहभागी कोणत्याही व्यक्तीविरोधात पोलीस यंत्रणेकडून कोणतीही प्रतिकूल किंवा कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार नाहीये. हे प्रकरण आता पूर्णपणे बंद मानले जाईल.” सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जोयमल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले होतं की, आंदोलनाशी संबंधित १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या अल्पवयीनांची तातडीने सुटका करण्यात यावी. पोलीस एफआयआरचा तपास सुरू ठेवू शकतात.

परंतु आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही जबरदस्तीची किंवा कठोर कारवाई केली जाऊ नये. याच आदेशाचा हवाला देत दिल्ली सरकारने गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या आंदोलकांना पूर्ण संरक्षण दिलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT