Gyanu Must Go Cjp Announces Jail Bharo Protest In Mumbai On October 2 saam tv
देश विदेश

CJP Protest: ज्ञानू मस्ट गो! दिपकेंचा इशारा; CJPचं मुंबईत जेल भरो आंदोलन

CJP Protest Against CEC Gyanesh Kumar: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आता CJP रस्त्यावर उतरणार आहे.मात्र पोलिसांनी मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारलीय.त्यामुळे CJPनं कोणती नवी रणनीती आखलीय? मुंबई होणाऱ्या या आंदोलनासाठी दिपकेंनी काय घोषणा केलीय? पाहूयात हा स्पेशल रिपोर्टमधून.

Suprim Maskar

  • CJPने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणी

  • मुंबई पोलिसांनी 2 ऑक्टोबरला शिवाजी पार्क येथे CJPच्या प्रस्तावित आंदोलनाला परवानगी नाकारली.

  • परवानगी नाकारल्यानंतर अभिजीत दीपके यांनी 2 ऑक्टोबरला ‘जेल भरो आंदोलन’ करण्याची घोषणा केली.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभारावर आणि निवडणूक आयोगाच्या एकूणच कामकाजावर CJPनं तीव्र आक्षेप नोंदवत ज्ञानू मस्ट गो आंदोलन छेडलयं.मात्र या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानं CJPनं आता थेट जेल भरो आंदोलनाचा इशारा दिलाय. CJPचे अभिजित दिपके म्हणाले.

नागरिकांचा आवाज दाबण्याचे हे प्रकार आम्हाला मान्य नाहीत. आम्हाला जर शांततेनं विरोध करण्याचा अधिकार दिला नाही तर गांधी जयंतीला मुंबईत जेल भरो आंदोलन सुरु करू. एकीकडे दिपकेंनी मुंबईत आंदोलनाची हाक दिली असली तरी दुसरीकडे स्कूल ठिक करो अभियानानंतर आसाममध्ये CJPचे राष्ट्रीय सह-संयोजक आशुतोष रांका आणि त्यांच्या टीममधील 40 जणांना बेकायदा ताब्यात घेण्यात आल्याचा आरोपही दिपकेंनी केलाय.तसचं मुंबईतील आंदोलनात जास्तीतजास्त लोकांनी सहभागी व्हावं, असे आव्हानही केलयं. दरम्यान मुंबई पोलिसांनी CJPच्या आंदोलनाला परवानगी नाकारताना काय स्पष्टीकरण दिलयं,पाहूयात.

एका जनहित याचिकेनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशनुसार शिवाजी पार्क मैदान खेळाव्यतिरिक्त कोणत्याही प्रयोजनासाठी वापरण्याबाबात निर्बंध घालण्यात आलेत. मैदानात आंदोलन करण्यासाठी BMCचे परवानगी पत्र जोडलेले नाही. शिवाजी पार्क परिसर शांतता क्षेत्र असल्याचं ध्वनी प्रदूषण होण्याची शक्यता आहे. आंदोलनामुळे वाहतुक कोंडी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे CJPला परवानगी नाकारण्यात आली.

दरम्यान CJPचे संघटन प्रमुख असणाऱ्या अजिंक्य शिंदे यांना मुंबई पोलिसांनी पर्यायी जागेवर आंदोलन करण्याचा सल्ला दिलाय. मात्र CJP ने परवानगी नाकारल्याचा निषेध करत 'जेल भरो'चा पवित्रा कायम ठेवलाय. दरम्यान CJPचे संघटन प्रमुख असणाऱ्या अजिंक्य शिंदे यांना मुंबई पोलिसांनी पर्यायी जागेवर आंदोलन करण्याचा सल्ला दिलाय. मात्र CJP ने परवानगी नाकारल्याचा निषेध करत 'जेल भरो'चा पवित्रा कायम ठेवलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope: नोकरीत नवीन जबाबदारी अन् आर्थिक लाभ; ‘या’ 3 राशींसाठी आजचा दिवस ठरणार फायदेशीर

ज्ञानेश कुमारांच्या पुतळ्याची गाढवावरून प्रतिकात्मक धिंड; काँग्रेससह विरोधक रस्त्यावर

NCP Merger: 'आम्ही कुणासोबतही जाणार नाही'; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला शरद पवारांकडून ब्रेक

महाराष्ट्रातील कॉलेजमध्ये रंगणार सत्तासंघर्षाचा आखाडा; Gen Zसाठी सत्ताधाऱ्यांचा गेमचेंजर प्लॅन?

Drought Relief: दुष्काळग्रस्तांना हेक्टरी 75 हजार मदत? सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा?

SCROLL FOR NEXT