solapur crime news saam tv
देश विदेश

ना सोनं- चांदी, ना पैसा... लखनौमध्ये चोरट्यांनी पळवली १७ लाखांची चॉकलेट

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये चोरट्यांनी पैसे नव्हे तर चॉकलेट चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

साम वृत्तसंथा

लखनौ : उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी लखनौमध्ये चोरट्यांनी पैसे नव्हे तर चॉकलेट चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजधानी लखनौमधील चिन्हाटमधील देवराजी विहार परिसरात कॅडबरी कंपनीच्या गोदामातून चोरट्यांनी १७ लाख रुपये किंमतीची चॉकलेट्स चोरल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर आपली ओळख उघड होऊ नये म्हणून चोरट्यांनी सीसीटीव्ही आणि डीव्हीआरही सोबत नेले.

मिळालेली माहिती अशी, ही घटना १५ ऑगस्टच्या रात्रीची असून, देवराजी विहार परिसरातील कॅडबरी कंपनीच्या गोदामातून चोरट्यांनी १७ लाख रुपयांची चॉकलेट आणि बिस्किटे पळवली होती. सध्या या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी (Police) चोरट्यांना पकडण्यासाठी शोध सुरू केला आहे.

'आम्ही चिन्हाट पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच आम्ही लोकांना माहिती देण्यासाठी आवाहन केले आहे, अशी माहिती कॅडबरीचे वितरक राजेंद्र सिंह सिद्धू यांनी दिली. ओमॅक्स सिटीमध्ये राहणारे व्यापारी राजेंद्र सिंग सिद्धू हे कॅडबरी डीलर आहेत आणि गेल्या दोन महिन्यांपासून भाड्याच्या घरात राहत आहेत.

राजेंद्र सिंह सिद्धू यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांनी देवराजी विहार भागात असलेल्या त्यांच्या घरी गोदाम बनवले आहे. १५ ऑगस्टच्या रात्री शेजाऱ्यांनी गोडाऊनच्या आतील दरवाजा उघडला असल्याची माहिती दिली. त्यानंतर चोर आला आणि त्याने गोदामातून चोरी झाल्याचे पाहिले. गोदामातून सुमारे १७ लाख रुपये किमतीची कॅडबरीची चॉकलेट्स आणि बिस्किटे गायब झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: तरुणाकडून वयोवृद्ध आईवर दोनदा बलात्कार, आधी बेदम मारहाण नंतर...; म्हणाला - 'ही तुझ्या कर्माची शिक्षा'

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधान मुंबईत कुठे राहते? माहितीये का?

'युतीचं डोक्यातून काढून टाका'; महायुतीत अलबेल नाही? अजित पवार गटाचे खासदार असं का म्हणाले?

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Ravivar Upay: रविवारच्या दिवशी सूर्यदेवाची पुजा केल्यानंतर करा 'हे' उपाय; अडकलेली सर्व कामं होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT