नवी दिल्ली: एक दिवसापूर्वी सोन्या (Gold)-चांदीच्या दरात झालेली घसरण आज भरून काढली आहे. जागतिक बाजारातील किमतीत वाढ झाल्याने बुधवारी सकाळी भारतीय वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या दरातही वाढ झाली आणि सोन्याचा भाव पुन्हा एकदा ५२ हजारांच्या जवळ पोहोचला आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर, आज सकाळी २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव ६० रुपयांनी वाढून ५१,८९७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. यापूर्वी सोन्याचे (Gold)- दर ५१,८४३ रुपयांच्यावर सुरू झाला होता, पण मागणी वाढल्याने त्याची किंमत लवकरच ५१,९०० रुपयांच्या जवळ पोहोचली आहे. सोने सध्या मागील किमतीच्या तुलनेत ०.१२ टक्क्यांनी वाढले आहे.
आज सकाळी चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. एससीएक्सवर, चांदीची किंमत १६५ रुपयांनी वाढून ५७,८३० रुपये प्रति किलो झाली आहे. यापूर्वी, चांदीचे दर ५५,७७६ च्यावर सुरू झाला होता, पण मागणी वाढल्याने लवकरच त्याचे भाव ५७,८०० च्या पुढे गेले आहेत. चांदी सध्या मागील किमतीच्या तुलनेत ०.२९ टक्क्यांनी उसळी घेत आहे.
आज जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीतही वाढ झाली आहे. आणि अमेरिकन बाजारात सोन्याची किंमत १,७७८.७८ डॉलर प्रति औंस होती, जी मागील किंमतीपेक्षा ०.१७ टक्के जास्त आहे. चांदीची किंमत देखील मागील किंमतीपेक्षा ०.२९ टक्क्यांनी वाढून २०.१९ डॉलर प्रति औंस झाली आहे. सोन्या-चांदीच्या दरात एक दिवसापूर्वी मोठी घसरण झाली होती, सोने ५७३ रुपयांनी आणि चांदी १३०० रुपयांनी स्वस्त झाले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.