Chinese Retail Tycoon Saam Digital
देश विदेश

Chinese Retail Tycoon : मूड नसेल तर ऑफिसला येऊ नका, कर्मचाऱ्यांसाठी कंपनीची खास ऑफर

Chinese Retail Tycoon Company : मूड नसेल तर ऑफिसला येऊ नका असं जर तुम्हाला तुमच्या बॉसने सांगितलं तर. तुमचा निश्चितच यावर विश्वास बसणार नाही. मात्र हे अगदी खरं आहे.

Sandeep Gawade

मूड नसेल तर ऑफिसला येऊ नका असं जर तुम्हाला तुमच्या बॉसने सांगितलं तर. तुमचा निश्चितच यावर विश्वास बसणार नाही. मात्र हे अगदी खरं आहे. एका कंपनीनं कर्मचा-यांच्या मूडनुसार त्यांना ऑफिसला येण्याची मुभा दिलीय. पाहूयात त्यावरचाच हा रिपोर्ट

ऑफिसला जाण्याची इच्छा नसेल तर अनेकजण तब्येत बिघडल्याचं कारण देऊन सुट्टी घेतात. मात्र ब-याचदा ही थाप पचत नाही. त्यामुळे अशा सुट्टीबहद्दर कर्मचा-यांना बॉसची बोलणी खावी लागतात. मात्र तुमचा कामवर जायचा मूड नसेल आणि तुम्हाला 10 दिवसांची सुट्टी मिळाली तर...होय हे अगदी खरंय. एका कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क लाइफ बॅलेन्स राखण्यासाठी मूडनुसार सुट्टी देऊ केलीय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ही कंपनी नेमकी आहे तरी कुठची? तर ही चीनमधली कंपनी आहे.

चायनीज रिटेल टायकून असं या कंपनीचं नाव आहे. या कंपनीचे मालक यू डोंगलाई यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना खूश करण्यासाठी या विशेष सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. या सुट्ट्या अनहॅपी लिव आहेत ज्या सीएल, पीएल किंवा मेडिकल लिव्हच्या व्यतिरिक्त दिल्या जातील. जर तुम्हाला ऑफिसला येण्याची इच्छा होत नसेल त्यावेळी या सुट्ट्या घेऊन तुम्ही घरीच आराम करू शकता. आता भारतातील कर्मचारीही हाच विचार करत असतील की या चिनी कंपन्यांनुसार आम्हालाही अशा सुट्ट्या कधी मिळतील?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

Rohit Sharma: रोहित शर्मा स्वतःहून निवृत्ती घेणार नाही; मोहम्मद कैफच्या वक्तव्याने रंगली नवी चर्चा

SCROLL FOR NEXT