सध्या देशात BAT-BMS नावाचे एक चिनी स्मार्टफोन अॅप सोशल मीडियावर व्हायरल होतंय. या अॅपचा वापर करून काहीजण ब्लूटूथद्वारे ई-रिक्षा किंवा इतर इलेक्ट्रीकल वाहनं लांबच्या अंतरावरून बंद करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.
पाहिलंत... हे अॅप नेमकं काय करतं ते....आता हे अॅप नेमकं काय आहे, यावर एक नजर टाकूयात....BAT-BMS हे अॅप इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीमशी जोडलेले बॅटरी मॅनेजमेंट अॅप आहे. हे अॅप बॅटरीची स्थिती, चार्जिंग सायकल, तापमान, व्होल्टेज पातळी आणि वीज पुरवठा यावर लक्ष ठेवते. अनेक बॅटरी उत्पादक ब्लूटूथ किंवा इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून युजर्सना त्यांच्या मोबाईलवर बॅटरीची माहिती पाहता यावी, यासाठी हे अॅप उपयुक्त ठरतं.
ई-रिक्षांमध्ये वापरल्या जाणाऱ्या चिनी बॅटरी मॅनेजमेंट सिस्टिमशी हे अॅप लिंक होतं. त्यामुळे काही ई-रिक्षा कधीही लॉक केल्या जाऊ शकतात. त्यामुळेच आता केंद्र सरकार प्ले स्टोअरवरून हे अॅप हटवण्याचे आदेश दिले आहेत. तसंच भारतात या अॅपवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे तुम्हा इलेक्ट्रीकल कार किंवा रिक्षा वापरत असाल तर खबरदारी घ्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.