Typhoon Yagi Video 
देश विदेश

Typhoon Yagi Video: निसर्ग कोपला! प्रतितास 300 km च्या गतीने येतंय विशानकारी वादळ, चीनमधील नागरिकांना घरातून बाहेर निघण्यास बंदी

Bharat Jadhav

मुसळधार पाऊस झाल्यानंतर आता चीनमध्ये विनाशकारी वादळ येत आहे. हे वादळ सर्वात जास्त शक्तीशाली असल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान चीनमधील हवामान विभागाने चीनमध्ये टायफून यागी नावाचं वादळ येणार असल्याचा अंदाज वर्तवलाय.

हे वादळ सर्वात जास्त विनाशकारी असून चीनच्या हॉलिडे आयलँडवर धडकणार आहे. हॉलिडे हे पर्यटनस्थळ आहे. दरम्यान वादळ येणार असल्याची शक्यता वर्तवल्यानंतर चीनच्या नसरकारने तेथील लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

टायफून यानी नावाचं वादळ प्रतितास ३०० किमीच्या गतीने चीनच्या दिशेने जात आहे. वादळामुळे अनेक शहराचे नुकसान होणार आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, हे सर्वात शक्तीशाली वादळ आहे. ही बाब लक्षात घेत येथील सरकारने ४.२० लाख लोकांना सुरक्षित छावण्यात हलवण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Hainan island मध्ये ट्रेन, बोट आणि प्लाइट बंद करण्यात आलेत. यासह पुढील काही दिवस शाळा बंद राहणार आहेत.

चीनच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे वादळ हेनान बेटाजवळील गुआंगडोंगलाही प्रभावित करेल. या वादळाला श्रेणी ५ मध्ये ठेवण्यात आले आहे. ज्या ठिकाणी या वादळाचा प्रभाव कमी होईल तिथील लोकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चीनच्या विविध भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : किरकोळ वाद टोकाला गेला; दोन कुटुंबात लोखंडी रॉड आणि बांबूने तुफान हाणामारी, VIDEO

Fact Check: 99 रुपयांत मिळणार दारू? सरकारचं आणलं नवं मद्य धोरण? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? वाचा...

Tirupati laddu news : तिरूपतीच्या लाडूंमध्ये चरबी, माशांचं तेल; आरोप-प्रत्यारोपांचा तडका, राजकीय फोडणी

Maharashtra Politics: मविआत मोठा भाऊ कोण? जागांवर अडले, भाऊ-भाऊ भिडले; मविआत जागावाटपावरून खडाजंगी

Budgam Bus Accident Video: काश्मीरमध्ये पुन्हा भीषण दुर्घटना; BSF जवानांनी खचाखच भरलेली बस खोल दरीत कोसळली, ४ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT