China New Virus Like Covid 19 Saam Tv
देश विदेश

Corona Virus : जगावर पुन्हा कोरोनासारखं संकट? चीनमध्ये आढळला जीवघेणा व्हायरस

China New Virus Like Covid 19 : चीनमध्ये कोरोनासारखाच एक नवा विषाणू आढळला आहे... या विषाणूचं नाव काय आहे? आणि या विषाणूची वैशिष्ट्ये काय आहेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये..

Saam Tv

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

China New Virus : कोरोनामुळे जगभर मृत्यूचं तांडव घडवणाऱ्या चीनच्या वूहान लॅबमध्ये आता कोरोनासारखाच घातक नवा विषाणू आढळून आलाय. हा विषाणू चीन बाहेर पसरल्यास संपूर्ण जग पुन्हा एकदा थांबण्याची शक्यता वर्तवली जातेय.. आणि त्यामुळे सर्व देशांचं टेंशन वाढलंय. मात्र चीनच्या वुहान लॅबमध्ये आढळलेला आणि जगाचं टेन्शन वाढवणाऱ्या विषाणूची वैशिष्ट्ये काय आहेत? पाहूयात..

चीनच्या नव्या व्हायरसने जगाला धडकी

- 'HKU5' हा नवीन प्रकारचा कोरोना व्हायरस

- हाँगकाँगमधल्या जपानी वटवाघळांमध्ये हा विषाणू प्रथम आढळला

- कोव्हिड-19 ला कारणीभूत ठरणारा HKU5 हा विषाणू

- जनावरांमधून माणसामध्ये होतो HKU5 विषाणूचा संसर्ग

- ACE2 रिसेप्टरशी संबंधित हा विषाणू माणसांमध्ये पसरण्याचा धोका

- नव्या विषाणूचा लहान मुलांना सर्वाधिक धोका

हा महाभयंकर विषाणू आढळून आलाय.. याला साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट आणि शी झेंगली या अभ्यास संस्थेने दुजोरा दिलाय. तर या विषाणूचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसण्याचा दावा करण्यात आलाय... त्यामुळे या नव्या विषाणूपासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी? पाहूयात..

नव्या विषाणुपासून काय काळजी घ्याल?

- मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा

- शिंकताना, खोकताना नाकासमोर रुमाल ठेवा

- आजारी असताना लोकांशी हस्तांदोलन किंवा गळाभेट टाळा

2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांची रोगप्रतिकार शक्ती कमी असल्याने या नव्या विषाणूचा मुलांना सर्वाधिक धोका आहे.. त्यामुळे चीनमध्ये निर्माण झालेला हा नवा विषाणू आपल्या दारावर टकटक करण्याआधी आपण स्वतःची आणि मुलांचीही काळजी घ्यायला हवी... एवढंच नाही तर प्रशासनानेही आंतरराष्ट्रीय प्रवाशांची चाचणी करायला हवी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये काँग्रेसला उतरती कळा, माजी महापौर, माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

Manikrao Kokate : काहीतरी मोठं होणार? माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, अजित पवारांनी दौरे रद्द केले, CM फडणवीसांची घेतली भेट

Pune : भारतात अस्थिरता निर्माण करण्यासाठी अमेरिका, चीन प्रयत्नशील, प्रवीण दीक्षित यांचे मत

Ind Vs Sa: चौथ्या सामन्यात बुमराह करणार कमबॅक? पाहा सिरीज जिंकण्यासाठी कशी असेल भारताची प्लेईंग 11

Madhuri Dixit Photos : "परी हो या हो परियों की रानी..."; गुलाबी ड्रेसमध्ये 'धक धक गर्ल'चं आरस्पानी सौंदर्य

SCROLL FOR NEXT