पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इशाऱ्यानंतर आता पाकला धडकी भरलीय. पीओके हातून जाऊ नये, यासाठी पाक लष्करप्रमुख मुनीर यांनी आता नवा डाव आखलाय. पाकिस्तानने पीओकेच्या वादात चीनला ओढलयं.
पाकव्याप्त काश्मीरच्या वादात चीनही एक पक्षकार आहे, असं विधान पाककडून केल जातयं. पीओकेच्या वादात चीनचं नाव का घेतलं जातय त्याची कारणं पाहूया...
.
चीनची पीओकेच्या वादात उडी कशासाठी?
भारतावर दबाबासाठी पाकनं घेतली चीनची मदत
चीन पाकिस्तानचा सर्वात जवळचा मित्र
1963 मध्ये पीओकेचा भाग पाककडून चीनला गिफ्ट
चीनचा महत्त्वाकांक्षी सीपीईसी प्रकल्प पीओकेतून जातो
चीनकडून पीओकेत 25.4 बिलियन डॉलरची गुंतवणुक
भारतानं पीओकेत कारवाई केली तर चीनचे नुकसान
भारत- चीन संघर्ष निर्माण होण्याची शक्य़ता
पीओकेच्या वादात चीनचा प्रवेश झाला तर पाकिस्तानच नाही तर चीनही उघडपणे भारताविरुद्ध मैदानात उतरेल. त्यामुळे भारतविरोधी कारवायात पाकिस्तानला चीनची मदत मिळेल. मात्र चीन आधीपासूनच पाकिस्तानला भारतविरोधात मदत करतोय. त्याचे 10 पुरावे ही समोर आलेत.
भारतविरोधी चीनच्या कुरापती
1) विंग लूंग ड्रोन, एचक्यू-16 क्षेपणास्त्र प्रणाली आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र या चिनी तंत्रज्ञानाचा भारताविरोधात वापर
2) सीपीईसी प्रकल्पाच्या नावाखाली पीओकेमध्ये पीएलए युनिट्स आणि सुरक्षा कंपन्या तैनात
3)पाक पुरस्कृत दहशतवाद्यांना संयुक्त राष्ट्रांमध्ये जागतिक दहशतवादी घोषित करण्यापासून रोखलं
पाक पुरस्कृत दहशतवाद्यांना संयुक्त राष्ट्रांमध्ये जागतिक दहशतवादी घोषित करण्यापासून रोखलं
4) कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला विरोध करत संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानला पाठिंबा
5) पाकिस्तानसोबत तणाव निर्माण होताच जाणूनबुजून अरुणाचल प्रदेशचा मुद्दा उकरून काढला
पीओकेत चीनचा वाढता हस्तक्षेप आता भारतासाठी आव्हान ठरणार आहे. त्यामुळे पाकनं जरी चीनला पीओकेच्या वादात ओढलं असलं तरी भारताची पीओके ताब्यात घेण्याची भूमिका बदलणार नाही. अशावेळी पाकसोबत चीनचाही बंदोबस्त भारताला करावा लागाणार, हे निश्चित.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.