China’s newly commissioned ‘Fujian’ aircraft carrier, equipped with stealth-capable launch systems, strengthens Beijing’s naval power in the Indo-Pacific. Saam Tv
देश विदेश

Fujian Aircraft: चीनची तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' नौदलात दाखल

China’s Fujian Aircraft: चीनने अधिकृतपणे त्यांची नवीन आणि सर्वात आधुनिक विमानवाहू युद्धनौका फुजियान नौदलात दाखल केलीय. हैनान प्रांतात झालेल्या एका समारंभात राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी फुजियान नौदलाकडे सोपवली. या युद्धनौकेमुळे हिंदी महासागरात चीनचं वर्चस्व वाढणार आहे.

Omkar Sonawane

चीनच्या नौदलात शक्तीशाली युद्धनौका दाखल झालीय. या युद्धनौकेचं नाव आहे फुजियान...तैवानच्या समोर असलेल्या चीनच्या फुजियान प्रांतावरून या युद्धनौकेला हे नाव देण्यात आलय. अलीकडेच हैनान प्रांतात झालेल्या एका समारंभात राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी फुजियान नौदलाकडे सोपवली. फुजियानचं वैशिष्ट्य म्हणजे ते संपूर्ण चिनी बनावटीचं असून त्याचं डिझाइन आणि बांधणीदेखील चीनमध्येच करण्यात आलीय.

फुजियान युद्धनौकेचं वैशिष्ट्य ?

.फुजियान हे प्रगत विद्युत प्रणाली असलेलं एक अत्याधुनिक वाहक आहे. याठिकाणी चीनचं पहिलं स्टेल्थ विमान उडवण्यास सक्षम यंत्रणा आहे. त्यामुळे इथं स्टेल्थ लढाऊ विमानं तैनात करण्यात आली आहेत. हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॅटापल्ट सिस्टमने सुसज्ज आहे, जे अमेरिकेने त्यांच्या नवीन विमानवाहू जहाजांमध्ये वापरलेलं तंत्रज्ञान आहे. याच कारणामुळे तैवानपासून हिंदी महासागरापर्यंत चीनचा प्रभाव वाढणार आहे.

हिंदी महासागरात आपलं प्राबल्य वाढवण्यासाठी चीन सातत्याने प्रयत्नशील आहे. याच रणनीतीचा एक भाग म्हणून चीनने आपली सुसज्ज युद्धनौका तैवानच्या समुद्रात उतरवलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Winners List : बिग बॉस सीझन 1 ते 19; कोण कोण ठरलं BB ट्रॉफीचे मानकरी? पाहा विजेत्यांची यादी

Bigg Boss 19 Winner Gaurav Khanna : पहिल्या नजरेत प्रेम! ९ वर्षांचा संसार; फिल्मी स्टाइल प्रपोज, वाचा गौरव खन्नाची प्यारवाली लव्हस्टोरी

Bigg Boss 19 Winner: गौरव खन्नाने उचलली 'बिग बॉस 19'ची ट्रॉफी; फरहाना भट्टला दिली मात

Bigg Boss 19 - Pranit More : 'बिग बॉस १९' चे घर गाजवणाऱ्या महाराष्ट्रीयन भाऊची संपत्ती किती?

Pranit More Struggle Journey : दादरची चाळ ते बिग बॉसचे घर कसा होता प्रणित मोरेचा संघर्षमय प्रवास? वाचा महाराष्ट्रीयन भाऊची कहाणी

SCROLL FOR NEXT