Chhattisgarh Crime News  Saam TV
देश विदेश

Crime News : आरोग्य केंद्रात नर्सवर सामूहिक बलात्कार; काळिमा फासणारी घटना

छिपछीपी गावातील आरोग्य केंद्रात एका नर्सला बांधून तिच्यावर चार जणांनी सामूहिक बलात्कार केला.

साम टिव्ही ब्युरो

Crime News : छत्तीसगडच्या महेंद्रगड जिल्ह्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली. जिल्ह्यातील छिपछीपी गावातील आरोग्य केंद्रात एका नर्सला बांधून तिच्यावर चार जणांनी सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Police) ३ आरोपींना बेड्या ठोकल्या असून चौथा आरोपी फरार आहे.

प्राप्त माहितीनुसार,महेंद्रगड जिल्ह्यातील छिपछीपी गावात प्राथामिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रात पीडिता नर्स एकटीच काम करत होती. नर्स एकटी असल्याची संधी साधून आरोपींनी शुक्रवारी ३ वाजेच्या सुमारास आरोग्य केंद्रात प्रवेश केला. त्यानंतर आरोपींनी (Crime News) पीडितेला बांधून तिच्यावर बलात्कार केला.

बलात्कार करताना आरोपींनी चित्रिकरण सुद्धा केलं. याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. या घाणेरड्या प्रकारामुळे पीडिता प्रचंड घाबरली. तिने तातडीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. चौथा आरोपी फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींमधील एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती आहे. दरम्यान, आरोग्य केंद्रात घुसून जबरदस्तीने महिला नर्सवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस येताच परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्यात आली नाही तर आम्ही काम बंद करू, असा इशाराही आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : Heart Attack पासून स्वतःला वाचवायचंय? रोजच्या जगण्यात या ५ गोष्टी नक्की करा, आयुष्य बदलेल

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

SCROLL FOR NEXT