Chhattisgarh Crime News
Chhattisgarh Crime News Saam TV
देश विदेश

Chhattisgarh Crime News: बॉईज हॉस्टेलमध्ये मुलींचा विचित्र आवाज; पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती आली समोर

Ruchika Jadhav

Chhattisgarh News: भूत, आत्मा अशा गोष्टींवर अनेक व्यक्ती आजही विश्वास ठेवतात. आपल्याला स्वत:ला या गोष्टींचा अनुभव आला आहे, असे दावे काही व्यक्ती करतात. अशात छत्तीसगड येथून एक चित्तथरारक बातमी समोर आली आहे. महासुंदच्या शासकीय मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये एक विचित्र प्रकार घडला आहे.(Latest Crime News)

हे एक बॉईज हॉस्टेल (Boyes Hostel) आहे. येथे काही मुलांना काळजाचा थरकाप उडेल असा मुलींचा आवाज ऐकू आला आहे. काही मुलांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या हॉस्टेमधून रात्री २ ते ३ च्या सुमारास मुलींच्या जोरजोरात ओरडण्याचा आणि भयानक पद्धतीने हसण्याचा आवाज ऐकू येत होता. त्यामुळे ही मुलं फार भयभीत झालीत.

पुढे पोलिसांकडे याबाबत तक्रार केल्यावर पोलिसांनी देखील घटनास्थळी जाऊन पहाणी केली. त्यांनी दुसऱ्या दिवशी रात्री तेथे जाऊन पाहाणी केली. त्यावेळी किचन आणि कॅन्टीन या परिसरातून मुलींच्या हसण्याचा आवाज त्यांनाही ऐकू आला. त्यामुळे त्यांनी कोण आहे त्याने बाहेर या असा आवाज दिला. त्यानंतर येणारा भयानक हसण्याचा आवाज बंद झाला. यावेळी पोलिसांनी आवाज येत असलेल्या खोलीत जाणे टाळले.

सदर घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या हॉस्टेलमध्ये एकून ५४ विद्यार्थी आहेत. सध्या उन्हाळ्याची सुट्टी असल्याने बरेच विद्यार्थी आपल्या घरी गेलेत. मुलींचा आवाज आला तेव्हा हॉस्टेलमध्ये फक्त ६ मुलं होती.

अशात हा आवाज नेमका कोण काढत आहे याचा तपास पोलीस करत आहेत. महासमुंदचे अतिरिक्त पोलीस निरिक्षक आकाश राव यांनी या बाबत असं म्हटलं आहे की, किचन आणि कॅन्टीनमध्ये अशा अनेक इलेक्ट्रॉनीक वस्तू आहेत ज्याला ब्लुतूथ कनेक्ट करता येऊ शकते. त्यामुळे कोणीतरी मुद्दाम घाबरवण्यासाठी असे करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Astrology: नखांचा आकार सांगतो व्यक्तीचा स्वभाव

Mumbai Crime: ४० वर्षांनंतर ७० व्या वर्षी दाऊदला पकडलं! १९८४ साली केलेल्या अक्षम्य 'पापा'चे घडे भरले!

Jasmine Bhasin : जास्मिन भसीनचा ग्लॅमरस लूक; वेस्टर्न आऊटफिटमध्ये दिसतेय खास!

Today's Marathi News Live : आदित्य ठाकरे यांचा उद्या मावळ लोकसभा दौरा

Tamannaah Bhatia : चांद तू नभातला नि बावळा चकोर मी

SCROLL FOR NEXT