Chhattisgarh Latest news  Saam tv
देश विदेश

Naxalists killed in Chhattisgarh : नक्षलवादी-पोलिसांमध्ये धुमश्चक्री! 30 नक्षल्यांचा सुपडासाफ, VIDEO

Chhattisgarh baster news : छत्तीसगडच्या बस्तरमध्ये शुक्रवारी सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांध्ये चकमक झाली. या चकमकीत ३० नक्षलवादी मारले गेले आहेद. छत्तीसगडमधील नारायणपूर-दंतेवाडा सीमेवर ही घटना घडली आहे.

Saam Tv

Chhattisgarh News : छत्तीसगडमध्ये पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. नारायणपूर-दंतेवाडा सीमेवरील माड परिसरात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत आतापर्यंत ३० नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. त्यांच्याकडील शस्त्रांस्त्रांचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला आहे. घटनास्थळावर शोधमोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, शुक्रवारी दुपारी छत्तीसगडच्या बस्तर परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली होती.

आतापर्यंतच्या कारवाईत ३० नक्षलवादी ठार झाले आहेत. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नारायणपूरचे पोलीस अधीक्षक प्रभात कुमार यांनी चकमक सुरूच असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच पोलीस अधिकारी, कर्मचारी सुरक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.

या घटनेला दुजोरा देत अधिकाऱ्यांनी सांगितलं की, नक्षलवाद्यांचे ३० मृतदेह आढळले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा देखील आढळला आहे. मागील वर्षभरात या भागातील १७१ नक्षलवाद्यांना मारले गेले आहेत. दंतेवाडा आणि नारायणपूरसहित सात जिल्ह्यात या चकमक घडल्या आहेत.

वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, घनदाट जंगलात नक्षलवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी नक्षलवाद्यांना घेरण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर अभियान सुरु केलं. त्यावेळी नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरु केला. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी देखील चोख प्रत्युत्तर दिलं. या चकमकीत ३० नक्षलवादी ठार झाले आहेत. या भागात दोन तास चकमक सुरु होती. या नक्षलवाद्यांना टिपण्यासाठी सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं होतं.

तीन दिवसांपूर्वी झालेल्या चकमकीत एका नक्षलवाद्यावर ४१ लाखांच बक्षीस होतं. तर एकावर २५ लाखांचं बक्षीस होतं. रुपेश नावाचा नक्षलवादी एका गटाचं नेतृत्व करत होता. त्याने महाराष्ट्रातील गडचिरोतील त्यांचा गट सक्रिय होता.

दरम्यान, घटनास्थळी मोठा शास्त्र साठाही सापडला आहे. सुरक्षा दलाकडून घटनास्थळी एके 47, एसएलआर यासह अत्याधुनिक शस्त्रांचा साठा सापडला आहे. मृतक नक्षलवाद्यांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT