भिलाईत हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर
इंस्टाग्रामवर वडिलांची आठवण काढत भावुक पोस्ट
पोस्ट केल्यानंतर अवघ्या २१ तासांत भीषण अपघात
एखाद्या मृत व्यक्तीची आठवण काढली आणि त्यानंतर आठवण करणाऱ्याचा मृत्यू झाला तर. ही घटना वाचतानाच आपल्याला अंगाला काटा येतो. अशीच एक धक्कादायक घटना छत्तीसगड येथील भिलाई येथे घडली आहे. येथील एका तरुणाने त्याच्या मृत वडिलांचे स्मरण केलं. त्यानंतर इंस्टाग्रामवर एक भावनिक स्टेटस पोस्ट केली. ही पोस्ट केल्यानंतर अवघ्या २१ तासांतच त्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. या अजब योगायोगामुळे लोकांना धक्का बसलाय.
हाती आलेल्या माहितीनुसार, दुर्गच्या भिलाई जामुल पोलीस स्टेशन परिसरातील नादनी रोडवर या तरुणाचा अपघात झाला. प्रवीण कुमार धृतलहरे असे या तरुणाचे नाव आहे. तो सुपेला येथील रहिवासी असून त्याचे वय २६ वर्ष होते. प्रवीण कुमार धृतलहरे हा तीन मित्रांना घरी घेऊन जात होता. ते रात्रीच्या वेळी प्रवास करत होते. त्यावेळी वेगाने जाणारी त्यांची कार अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबाला धडकली.
खांबावर कार आदळताच कारच्या एअरबॅग्ज निकामी झाल्या. यात गाडीचे मोठे नुकसान झाले तर प्रवीणचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचे तीन मित्र दुर्गेश माडले, आकाश केशरवानी आणि राहुल साहू गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे या अपघातापूर्वी प्रवीणने आपल्या इंस्टाग्रामवर एक स्टेटस ठेवलं होतं. यात त्याने आपल्या वडिलांचे स्मरण केलं होतं.
ज्यामध्ये त्याने त्याच्या वडिलांची आठवण काढत लिहिले होते... 'तुमची आठवण येतेय बाबा... आज मला तुमची खूप आठवण येतेय... या आणि मला तुमच्यासोबत घेऊन जा.' कुटुंबातील सदस्य, नातेवाईकांच्या आणि मित्रांच्या मते प्रवीणच्या वडिलांचे तीन महिन्यापूर्वी निधन झाले होते. ते एका आजाराने झुंजत होते. दरम्यान वडिलांच्या मृत्यूमुळे प्रविण मानसिकदृष्ट्या अस्थिर झाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.