Cheetah Death Saam Tv
देश विदेश

Kuno Cheetah Death : कुनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका चित्त्याचा मृत्यू, ४ महिन्यातली ७वी घटना, नेमकं काय घडलं?

Tejas Cheetah Death: कुनो नॅशनल पार्कमधील चित्त्याचा मृत्यू होण्याची ही गेल्या चार महिन्यातील सातवी घटना आहे.

Priya More

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) कुनो नॅशनल पार्कमध्ये (Kuno National Park) दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) आणलेल्या चित्त्यांपैकी आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी या चित्त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कुनो नॅशनल पार्कमधील चित्त्याचा मृत्यू होण्याची ही गेल्या चार महिन्यातील सातवी घटना आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुनो नॅशनल पार्कमध्ये मंगळवारी सायंकाळच्या सुमारस चार वर्षांच्या तेजस नावाच्या चित्त्याचा मृत्यू झाला. हा चित्ता जखमी अवस्थेत कुनोच्या जंगलामध्ये आढळून आला होता. त्याच्या मानेवर काही जखमा झाल्या होत्या. उपचार करण्यापूर्वीच तेजस चित्त्याचा मृत्यू झाला.

कुनोमधील ज्येष्ठ वनाधिकारी जे. एस. चौहान यांनी सांगितले की, चित्त्यांमध्ये झालेल्या झुंजीमध्ये तेजस नावाच्या या चित्त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेतून तेजस चित्त्याला आणण्यात आले होते. त्याला संरक्षित खुल्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते. त्यामध्येच तो जखमी अवस्थेत आढळून आला. गेल्या चार महिन्यांत चित्त्याचा मृत्यू झाल्याची ही सातवी घटना आहे.

जे. एस.चौहान यांनी पुढे सांगितले की, मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास ६ क्रमांकाच्या संरक्षित क्षेत्रात कर्मचाऱ्यांना तेजस जखमी अवस्थेत आढळून आला. तेजसच्या मानेवर काही जखमा होत्या. त्यानंतर उपचारांपूर्वी त्याला बेशुद्ध करण्यासाठी योग्य परवानग्या मागण्यात आल्या. परवानगी मिळाल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास डॉक्टरांचे पथक तिथे पोहोचले. मात्र उपचारापूर्वीच तेजसचा मृत्यू झाला.

कुनो नॅशनल पार्कमध्ये असलेल्या चित्त्यांचा मृत्यू होण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. २७ मार्च रोजी ‘साशा’ नावाच्या मादी चित्त्याचा मूत्रपिंडाच्या आजाराने मृत्यू झाला होता. त्यानंतर २३ एप्रिल रोजी ‘उदय’ नावाचा चित्ता मृतावस्थेत आढळून आला होता. ९ मे रोजी ‘दक्षा’ नावाच्या मादी चित्त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर ‘ज्वाला’नावाच्या मादी चित्त्याच्या चार बछड्यांपैकी तिघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता तेजस नावाच्या चित्त्याचा मृत्यू झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून कोट्यवधी रुपये खर्च करुन दक्षिण आफ्रिकेतल्या नामिबियातून भारतामध्ये चित्ते आणण्यात आले आहेत. पीएम मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने कुनो नॅशनल पार्कमध्ये हे चित्ते सोडण्यात आले होते. आतापर्यंत कुनो अभयारण्यात 20 चित्ते आणण्यात आले होते. यातील सात चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन बछड्यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: बीड जिल्ह्यात कोण जिंकलं? वाचा एका क्लिकवर

Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये राडा, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, पाहा Video

Longest River In Maharashtra: महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पवित्र तीर्थस्थान म्हणून ओळख

Vidhan Sabha Election Result : रायगड जिल्ह्यात महायुतीची सरशी; महाविकास आघाडीच्या हाती भोपळा

Maharashtra Election Result: उल्हासनगरात राष्ट्रवादीला जबर धक्का! भाजपच्या कुमार आयलानींचा मोठा विजय

SCROLL FOR NEXT