Petrol Diesel Latest Price Saam TV
देश विदेश

Petrol Diesel Prices Today: अनेक शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठा बदल; वाचा तुमच्या शहरातील नवे दर

Shivani Tichkule

Petrol Diesel Rate: भारतातील पेट्रोल-डिझेलचे दर दररोज सरकारी तेल कंपन्या जाहीर करतात. चार महानगरांमध्ये इंधनाचे दर स्थिर आहेत, मात्र अनेक प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाला आहे. नोएडामध्ये आज पेट्रोल 31 पैसे आणि डिझेल 28 पैसे स्वस्त दराने म्हणजेच पेट्रोल 96.69 रुपये आणि डिझेल 89.86 रुपयांनी विकले जात आहे. गाझियाबादमध्ये आज पेट्रोल 35 पैसे आणि डिझेल 33 पैसे स्वस्त दराने म्हणजेच पेट्रोल 96.23 रुपये आणि 89.42 रुपये प्रति लीटर विकले जात आहे.

दुसरीकडे, गुरुग्राममध्ये आज पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या दरात वाढ नोंदवली जात आहे. पेट्रोल 21 पैशांनी तर डिझेल 20 पैशांनी महागले असून ते 97.10 रुपये आणि 89.96 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. जयपूरमध्ये आज पेट्रोल 40 पैसे 108.08 रुपये आणि डिझेल 36 पैशांनी 93.36 रुपये स्वस्त दराने विकले जात आहे. लखनऊमध्ये पेट्रोल 26 पैसे आणि डिझेल 25 पैसे स्वस्त दराने म्हणजेच पेट्रोल 96.36 रुपये आणि डिझेल (Diesel) 89.56 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. (Latest Marathi News)

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.73 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर

– कोलकाता में पेट्रोल 106.03 रुपये और डीजल 92.76 रुपये प्रति लीटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. (Petrol Diesel Price)

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT