चरणजित सिंह चन्नी यांनी घेतली पंजाबच्या मुख्यमंत्री पदाची शपथ... Saam Tv news
देश विदेश

चरणजित सिंह चन्नी यांनी घेतली पंजाबच्या मुख्यमंत्री पदाची शपथ...

चरणजित सिंह चन्नी हे पंजाबचे १७ ने मुख्यमंत्री बनले आहे, तसेच पंजाबचे ते पहिले दलित मुख्यमंत्री बनले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चंदिगढ: मोठ्या राजकीय गोंधळानंतर अखेर पंजाब राज्याला नवा मुख्यमंत्री मिळाला आहे. कॉंग्रेसचे आमदार चरणजित सिंह चन्नी हे पंजाबचे १७ ने मुख्यमंत्री बनले आहे, तसेच पंजाबचे ते पहिले दलित मुख्यमंत्री बनले आहे. चरणजित सिंह यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर, सुखजिंदर रंधावा आणि ओपी सोनी यांनी उप-मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांना गोपनियतेची शपथ दिली आहे. राजभवनात हा सोहळा होत असून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू हे देखील या सोहळ्याला उपस्थित आहेत. (Charanjit Singh Channy was sworn in as the Chief Minister of Punjab)

हे देखील पहा -

शनिवारी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर चरणजित सिंग चन्नी यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी घोषणा करण्यात आली. कॉंग्रेस हायकमांडने दिवसभर घेतलल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर रूपनगर जिल्ह्यातील चमकौर साहिब विधानसभा क्षेत्रातून निवडुन आलेले कॉंग्रेसचे आमदार चरणजित सिंह चन्नी यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली. पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी सुखजिंदरसिंग रंधावा, नवज्योतसिंग सिद्धू, सुनिल जाखड यांच्या नावांची चर्चा होती. त्यात सर्वाधिक चर्चेत सुखजिंदरसिंग रंधावा यांचं नाव होतं. मात्र, या सर्व नेत्यांना डावलून पंजाबमधील दलित नेते चरणजीत सिंह चन्नी यांना मुख्यमंत्रीपदाची संधी काँग्रेसकडून देण्यात आली आहे.

कोण आहेत रणजीत सिंह चन्नी?

चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) दलित सिख (रामदसिया सिख) समुदायातून येतात आणि रूपनगर जिल्ह्यातील चमकौर साहिब विधानसभा क्षेत्रातून निवडुन आलेले आमदार आहेत. अमरिंदर सरकारमध्ये तांत्रिक शिक्षण आणि औद्योगिक प्रशिक्षण, रोजगार निर्मिती आणि प्रशिक्षण आणि पर्यटन आणि संस्कृती व्यवहार विभागाची जबाबदारी सांभाळली होती. २००७ साली पहिल्यांदा ते या विधामसभा मतदार संघातून निवडून आले होते आणि त्यानंतर सलग आमदारकी जिंकले होते. २०१५-२०१६ मध्ये जेव्हा पंजाबमध्ये शिरोमणि अकाली दल आणि भाजपा युतीची सत्ता होती तेव्हा ते विरोधीपक्ष नेते होते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवारांना धक्का; कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे आघाडीवर

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

Maharashtra Election Result: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? पाहा एका क्लिकवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

SCROLL FOR NEXT