इस्रोच्या चांद्रयान-३ मोहिमेकडे भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान चांद्रयान 3 च्या लँडिंगला एक दिवस बाकी असताना इस्रोने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे.
इस्रोने केलेल्या आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, मिशन नियोजित वेळापत्रकानुसार आहे आणि सिस्टमची नियमित तपासणी देखील केली जात आहे. यासोबतच मिशनचे निरीक्षण करणारे कॅम्पस देखील उत्साहाने आणि उर्जेने भरलेले आहे.
इस्रोने सांगितले की, चांद्रयान-3 च्या लँडिंगचे थेट प्रक्षेपण 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.20 वाजता सुरू होईल. यासोबत ISRO ने 19 ऑगस्ट 2023 रोजी विक्रम लँडरच्या लँडर पोझिशन डिटेक्शन कॅमेरा (LPDC) ने घेतलेले काही फोटो देखील शेअर केले आहेत. चंद्राच्या 70 किमी अंतरावरून हे फोटो घेतले आहेत.
अहमदाबादमधील इस्रोच्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे संचालक नीलेश एम. देसाई यांनी सांगितलं की, चांद्रयान 3 चंद्रावर उतरण्याच्या 2 तास आधी आम्ही लँडर आणि चंद्राच्या स्थितीचा आढावा घेऊ.
यानंतर आम्ही लँडर चंद्रावर उतरवण्याचा निर्णय घेऊ. जर आम्हाला वाटत असेल की लँडर किंवा चंद्राची स्थिती लँडिंगसाठी योग्य नाही तर आम्ही लँडिंगची तारीख 27 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलू. मात्र आमचा पहिला प्रयत्न 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर लँडर उतरवण्याचा असेल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.