Chandrayaan-3 Saam Tv
देश विदेश

Chandrayaan 3 Update : चंद्रावरील अंधारात विक्रम लँडरचा 'चमकदार' फोटो, चांद्रयान २च्या ऑर्बिटरचा झक्कास क्लिक

Vikram Lander Photo : फोटोत विक्रम लँडर खूपच लहान आणि सोनेरी रंगाचा दिसत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Chandrayaan 3 :

भारताचं मून मिशन चांद्रयान 3 यशस्वी झालं आहे. चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर तब्बल 14 दिवस विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने आपली जबाबदारी पार पाडली. त्यानंतर आता चंद्रावर रात्र असल्याने लँडर देखील 'झोपी' गेलं आहे. दरम्यान लँडरचा चांद्रयान 2 च्या ऑर्बिटरने फोटो कॅप्चर केला आहे. इस्रोने हा फोटो ट्वीटरवर शेअर केला आहे.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अजूनही अंधार आहे, म्हणजेच चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरने रात्री विक्रम लँडरचा फोटो घेतला आहे. चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरने घेतलेल्या फोटोत विक्रम लँडर खूपच लहान आणि सोनेरी रंगाचा दिसत आहे. (Latest News Update)

चांद्रयान 2 ऑर्बिटर

विक्रम लँडरचा हा फोटो खास आहे, कारण फोटोमध्ये अंधारात चंद्रावर निळे-हिरवे स्पॉट दिसत आहे. या निळ्या हिरव्या रंगात एक सोनेरी रंगाचा ठिपका दिसत आहे. ते आपलं विक्रम लँडर आहे. 2019मध्ये चांद्रयान 2 मिशन फेल झाले होते. मात्र त्याचं ऑर्बिटर आजही चंद्राभोवती फिरत आहे. त्याच ऑर्बिटरने विक्रम लँडरचा हा फोटो घेतला आहे. (Tajya Batmya)

नासानेही शेअर केला फोटो

यापूर्वी 27 ऑगस्ट रोजी अमेरिकन स्पेस एजन्सी NASA च्या Lunar Reconnaissance Orbiter (LRO) ने विक्रम लँडरचा फोटो काढला होता. नासाने 6 सप्टेंबरला हा फोटो शेअर केला होता. (International News)

इस्रोने 5 सप्टेंबरच्या संध्याकाळी विक्रम लँडरचा 3डी फोटो शेअर केला होता. प्रज्ञान रोव्हरने लँडरपासून 15 मीटर अंतरावर म्हणजेच सुमारे 40 फुटांवरून हा क्लिक केला होता. प्रज्ञान रोव्हरवर बसवण्यात आलेल्या दोन नेव्हिगेशन कॅमेऱ्यांच्या मदतीने हा फोटो घेण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो 'या' तारखेपर्यंत करा e-KYC, मंत्री आदिती तटकरेंनी दिली अखेरची मुदत

Maharashtra Live News Update: ठाकरे बंधू एकत्र आले तरी महायुतीला फरक पडणार नाही - रामदास आठवले

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर वाढवली सुरक्षा, २४ तास पोलीस तैनात राहणार, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

Accident: भरधाव डंपरची दुचाकीसह १७ वाहनांना धडक; १९ जणांचा मृत्यू, अपघाताचा थरारक सीसीटीव्ही VIDEO

Road Accident : ४८ तासांत 3 मोठे अपघात, 53 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

SCROLL FOR NEXT