Sanjay Raut And Chandrakant patil Saam Tv
देश विदेश

आजची पत्रकार परिषद म्हणजे 'खोदा पहाड निकला चुहा'- चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला राऊतांच्या पत्रकार परिषदेवर आपली प्रतिक्रिया देत, खोदा पहाड निकाला चुहा असे म्हणत राऊतांना टोला लगावला.

वृत्तसंस्था

मुंबई: आज संजय राऊत यांनी घेत असलेल्या पत्रकार परिषदेत अनेक गौप्यस्फोट करणार तसेच भाजपचे साडे तीन नेत्यांचा घोटाळा बाहेर काढणार असा दावा केला होता. त्यामुळे त्यांच्या निशाणा नेमका कोणावर असणार याची चर्चा संपूर्ण राज्यभरात होती. परंतु पत्रकार परिषदेत राऊतांनी थोडक्यातच काही मुद्द्यांमध्ये हात घातला. यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला राऊतांच्या पत्रकार परिषदेवर आपली प्रतिक्रिया देत, खोदा पहाड निकला चुहा असे म्हणत राऊतांना टोला लगावला.

चंद्रकांत पाटील म्हणाले, गरजेल तो पडेल काय? गेले दोन -तीन दिवस काहीतरी प्रचंड मोठं बाहेर काढणार आहेत, अश्या मोठ्या अविर्भावामध्ये जशी काय यांचीच प्रेस कॉन्फरन्स होत आहे. जगात कोणाची झालीच नाही, होणार, होणार, घेणार असं चाललं होत पण खोदा पहाड निकला चुहा असं झालेलं आहे. तुमच्याकडे पुरावे आहेत तुम्हाला काही म्हणयच आहे. पण यात नवीन काय आहे. कोणावर आरोप केल्याने याने काही होत नाही. तुम्ही संबंधित एजन्सीला ते द्या, कोर्टात जा. कोर्टच्या न्यायामुळेच आम्ही टिकलो आहोत. गेले २७ महिने महाविकास आघाडी सरकार जिंकलं नाही.

पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले, मला हेच कळत नाही काय पत्रकार परिषद काय यांचीच झाली? दोन दिवसांपासून या हो या हो असं चाललं होत. शिवसेनेनला सल्ला देण्याइतका मी मोठा नाही. पण संजय राऊतांनी त्यांच्या वर झालेले आरोप. आणि ते ते आरोप गळ्याशी आल्याने पूर्ण शिवसेना वापरली. आजची पत्रकार परिषद फुसका बार ठरली.

दरम्यान, आज सकाळी चंद्रकांत पाटील यांना राऊतांच्या पत्रकार परिषदेबद्दल विचारले असता, संजय राऊत हे काय बोलतील हे त्यांनाच विचारलं पाहिजे. त्यांच्या मनात काय आहे हे मी कस सांगणार ? त्यांचं बोलून झाल्यावर मी प्रतिक्रिया देईन. यावर भाजपचे साडे तीन नेते हे जेल मध्ये जातील तसे ते साडे तीन नेते कोण असतील यावर प्रश्न विचारला असता, चंद्रकांत पाटील म्हणाले, त्यांच्या मनात काय आहे डोक्यात काय आहे हे मी कस सांगू शकणार? मी आता दिल्लीला चाललोय त्यामुळे जेव्हा ते पत्रकार परिषद घेतील तेव्हा मी दिल्ली मधून सांगेन असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

हे देखील पहा -

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; अल्झायमरशी झुंज देताना घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Live News Update: पुढील चार दिवस राज्यात मेघ गर्जनेसह पाऊस

Daily horoscope today: महिन्याचा शेवट १२ राशींसाठी कसा होणार? या ५ राशींचं नशीब चमकून धनलाभ होणार, वाचा राशीभविष्य

ड्रग्स-वेश्या व्यवसायाची भीती दाखवली; मुंबईतल्या विवाहित महिलेला बोगस पोलिसांनी गंडवलं

Ladki Bahin Yojana: अपात्र लाडक्या बहिणींचा आकडा समोर; ७१ लाख महिलांचा ₹१५००चा लाभ कायमचा बंद

SCROLL FOR NEXT