मोहाली: चंदीगड विद्यापीठातील व्हिडिओ लीक प्रकरणी शिमला येथून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणावरुन विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी पोलिसांनी (Police) शिमला येथून एका मुलाला अटक केली आहे.
या घटनेबाबत विद्यार्थ्यांमध्ये संताप आणि निदर्शने झाल्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी रविवारी चौकशीचे आदेश दिले. प्राथमिक तपासानंतर, पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला आधीच अटक केली होती आणि आरोपी तरुणाला पकडण्यासाठी एक पथक हिमाचल प्रदेशला पाठवले होते.
'चंदिगड विद्यापीठ प्रकरणात पंजाब पोलिसांच्या विनंतीवरून हिमाचल प्रदेश पोलिसांनी संवेदनशीलता दाखवून आरोपीला ताब्यात घेतले आहे, याबाबत हिमाचल पोलिसांनी माहिती दिली.
या घटनेत असे दिसते की आरोपी विद्यार्थ्याने स्वत:चा एक व्हिडिओ तरुणांसोबत शेअर केला आहे आणि इतर कोणत्याही विद्यार्थ्याचा कोणताही आक्षेपार्ह व्हिडिओ सापडलेला नाही. त्याचबरोबर विद्यापीठाच्या वसतिगृहातील अनेक विद्यार्थिनींचे व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर शेअर केल्याचा दावा करणारे वृत्त 'खोटे आणि निराधार' असल्याचे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनीही फेटाळून लावले असून या प्रकरणानंतर अनेक विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची तक्रार असल्याची माहिती पोलिसांनी (Police) दिली.
'अनेक विद्यार्थिनींचे व्हिडिओ लीक झाल्याच्या अफवा पसरल्यानंतर मध्यरात्रीनंतर विद्यापीठात आंदोलन करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचा मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी जप्त करण्यात आला असून विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे एकही प्रकरण समोर आलेले नाही आणि या प्रकरणात कोणाचाही मृत्यू झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. अधिका-यांनी सांगितले की भारतीय दंड संहितेच्या कलम 354 सी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक विवेक शील यांनी दिली.
या विद्यापीठातील एका विद्यार्थिनीनं आंघोळ करताना इतर विद्यार्थिनींचा व्हिडिओ बनवला आणि तो इंटरनेटवर जोरदार व्हायरल झाला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर वसतिगृहातील (Girls Hostel) 8 विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.